यशवंतराव चव्हाण सेंटरच्या चर्चासत्रात पुरुषसत्ताक व्यवस्थेवर बोट' नांदेडमध्ये महिला ‘धोरण कुठंवर आलं गं बाई?’ यावर चर्चा!

नांदेड : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरच्या महिला विभागातर्फे राज्यभर ‘धोरण कुठंवर आलं गं बाई?’ या विशेष चर्चासत्राच...

नांदेड : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरच्या महिला विभागातर्फे राज्यभर ‘धोरण कुठंवर आलं गं बाई?’ या विशेष चर्चासत्राचे आयोजन १३ मार्च (शुक्रवार) रोजी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्राच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी स्वा.रा.ती.म. विद्यापीठाच्या प्रा. सुवर्णा मोरे यांनी व्यवस्थेवर कडक शब्दांत टीका करत समाजातील पुरुषसत्ताक पद्धतीमुळे केवळ पुरुषांना पोषक ठरणाऱ्या बाबींचीच अंमलबजावणी होते असे म्हटले. दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी धोरणे आखली जात असली तरी ती ‘वरून खाली’ लादली जात असल्याने अपेक्षित परिणाम साध्य होत नाहीत. त्यामुळे महिलांसाठीच्या अनेक योजना त्यांना खऱ्या अर्थाने सक्षम करण्यात अपयशी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
चर्चेत सहभागी झालेल्या भटक्या-विमुक्त जमातींसाठी कार्य करणारे मारुती वड्डे यांनी ग्रामीण भागात महिला धोरणांची पुरेशी माहितीच नसल्याचे वास्तव अधोरेखित केले. कायदे आणि योजना मोठ्या प्रमाणात असल्या तरी सामाजिक जागृतीचा अभाव आहे. आजही भटक्या जमातींना स्वतःच्या अस्तित्वासाठी पुरावे शोधावे लागतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. राजकीय क्षेत्रातील आव्हानांबाबत बोलताना डॉ. रेखा चव्हाण यांनी सांगितले की, राजकीय पक्षांच्या बैठकीत महिलांना आपले मत मांडण्याची संधी अनेकदा दिली जात नाही. ॲड. कल्पना डोंगळीकर यांनी महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या ‘दिसण्याला’ अधिक महत्त्व दिले जाते, ही बाब राजकीय असुरक्षिततेचे एक प्रमुख कारण असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात सामाजिक कार्यकर्त्या डॉ. करुणा पाटील यांनी सरकार आणि समाज यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित केली. अंमलबजावणीतील त्रुटींवर बोलताना पंचफुला वड्डे यांनी सांगितले की, अनेक कायदे आणि धोरणे कागदावरच राहतात असे मत नोंदवले.या चर्चासत्राचे आयोजन यशवंतराव चव्हाण सेंटरच्या नांदेड जिल्हा केंद्रातर्फे करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संदीपकुमार देशमुख यांनी स्वागत करून उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. शुभांगी पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रताप परभणकर आणि चव्हाण सेंटरच्या महिला विभागप्रमुख साधना तिपन्नाकजे यांनी सूत्रसंचालन केले, तर नरसिंग आठवले यांनी आभार मानले. या कार्यक्रमास डॉ. ज्योती धोंडगे, प्रा. शिवाजी जोगदंड, पंकज स्वामी, संजय मुलंगे यासह सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel