मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील महसूल मंडळ मौजे जांब येथे दिनांक 14 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीराचे आ...
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड)
मुखेड तालुक्यातील महसूल मंडळ मौजे जांब येथे दिनांक 14 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, आयोजित शिबीरामध्ये मा. राजेश जाधव तहसिलदार मुखेड यांनी अकृषिक परवानगी रद्द करण्यात आलेल्या अदयावत सुधारणा बाबत नागरीकांना सखोल मार्गदर्शन करुन एक वेळचे अधिमुल्य भरण्याचया नविन व्यवस्था बाबत नागरीकांमध्ये जनजागृती केलीतसेच मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना बाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच मुंबई जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विषयी नागरीकांना मार्गदर्शन केले आहे.
सदर शिबीरामध्ये ७/१२ अभिलेखामध्ये दुरुस्ती करुन नागरीकांना ७/१२ वाटप करण्यात आले, तसेच विदयार्थ्यांना उत्पंन्न प्रमाणपत्र, रहिवाशी अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉनक्रीमीलेअर प्रमाणपत्र अर्ज स्विकारुन वाटप करण्यात आले आहे. तसेच ७/१२ मधील दुरस्ती बाबत महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियमाचे कलम १५५ अन्वये दुरुस्ती करुन एकुण ७/१२ वाटप करण्यात आले आहेत. नागरीकांना कलम ४२अ, ४२ब, ४२क, ४२ड अन्वये सनद देण्याची प्रक्रीया संपुष्ठात आले बाबत नागरीकांना माहिती देण्यात आली व एक वेळचे अधिमुल्य भरण्याचया नविन व्यवस्था बाबत माहिती देण्यात आली. नागरीकांना आता भौतीक ७/१२ घेण्याची आवश्यकता नाही तर महाभूमी पोर्टलव्दारे डिजीटल ७/१२ डाऊनलोड करण्याबाबत प्रात्यक्षिक देण्यात आले, एक खिडकी योजनेअंतर्गत अॅग्रीस्टॅक, ई मोजणी, पि.एम. किसान, व नागरीकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद बिराजदार ग्राम महसुल अधिकारी यांनी केले तर यावेळी शिबीरास मा. राजेश जाधव तहसिलदार मुखेड, ढवळे गट विकास अधिकारी पंचायत समिती मुखेड, लोखंडे भूमी अभिलेख मुखेड, बोदमवाड एल.जी. तालुका कृषी अधिकारी मुखेड, डॉ. देशमुख तालुका आरोग्य अधिकारी मुखेड, डॉ. केंद्रे सहायक आयुक्त तालुका पशुवैदयकीय कार्यालय मुखेड, डॉ. मुकींकर पशुधन विकास अधिकारी मुखेड, निलेश रोहनकर पुरवठा निरीक्षक मुखेड, महाडीवाले के. व्ही. महसुल सहायक मुखेड, फड एस .एम मंडळ अधिकारी जांब बु, वाडीकर ग्रा.म.अ. रावी, शिंदे ग्रा.म.अ. जांब बु, चिंचोरे ग्राम महसुल अधिकारी सावरगाव, ठुबे ग्रा.म.अ वर्ताळा, नागेश्वर ग्रा.म.अ दापकाराजा, कांबळे ग्रा.म.अ होंडाला, वाघमारे ग्रा.म.अ. कामजळगा, श्रीकांत श्रीरामे ओपेरटर, पवन शिरबरतळ ओपेरटर, जि प शाळा जांब बु चे मुख्याध्यापक संजय थोटे, जांब बु मंडळातील सर्व गावातील सरपंच, ग्रामसेवक, महसुल सेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी कर्मचारी, व इतर नागरीक उपस्थित होते.

COMMENTS