मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील आंदेगाव वाडी भोजतांडा परिसरात घडलेल्या युवकाच्या खून प्रकरणात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने ...
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड)
मुखेड तालुक्यातील आंदेगाव वाडी भोजतांडा परिसरात घडलेल्या युवकाच्या खून प्रकरणात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने तिघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीस प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी रमेश गोविंद राठोड (रा. आंदेगाव वाडी, भोजू तांडा, ता. मुखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १० ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मोठा मुलगा विनोद राठोड हा घरासमोर बाजेवर झोपला होता. त्यावेळी चारही आरोपी तेथे येऊन गोंधळ घालू लागले. यावेळी आरोपी पिटू उर्फ अंकुश बळीराम राठोड याने विनोदच्या अंगावर मिरचीची पुड फेकली. काशाबाई धोंडीबा राठोड हिने विनोदचे हात पकडून धरले, तर धोंडीबा देवला राठोड याने विनोदच्या छातीवर चाकूने वार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विनोद राठोड याला तातडीने देगलूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २०४/२०२३ अंतर्गत भादंवि कलम ३०२,३२३,३२४, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जी. एच. कागणे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयात सुनावणीदरम्यान एकूण १५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.
साक्षीदारांचे जबाब आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद लक्षात घेऊन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. देशमुख यांनी १३ मार्च रोजी निकाल दिला.
न्यायालयाने आरोपी धोंडीबा देवला राठोड, पिटू उर्फ अंकुश बळीराम राठोड आणि काशाबाई धोंडीबा राठोड यांना भादंवि कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच आरोपी कल्पना उर्फ शामा धोंडीबा राठोड हिला कलम ३०२ मधून निर्दोष मुक्त करण्यात आले. मात्र तिला कलम ३२४ व ५०६ अंतर्गत एक वर्षाची शिक्षा व दोन हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला.
या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन भिकाजी खिल्लारे यांनी काम पाहिले. त्यांना पोलीस कॉन्स्टेबल राज वाघमारे यांनी सहकार्य केले.

COMMENTS