आज समाजशास्त्र विषयाचे महत्त्व वाढत आहे” – प्रा. डॉ. स्मिता अवचार यांचे प्रतिपादन

समाजशास्त्र परिषदेकडून सेवा गौरव सोहळा संपन्न छत्रपती संभाजीनगर :- कनिष्ठ महाविद्यालयीन समाजशास्त्र परिषद, छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या ...
समाजशास्त्र परिषदेकडून सेवा गौरव सोहळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर :- कनिष्ठ महाविद्यालयीन समाजशास्त्र परिषद, छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या वतीने सेवानिवृत्त प्राध्यापकांचा सेवा गौरव सोहळा आज दिनांक १३ मार्च, २०२६, शुक्रवार रोजी विभागीय मंडळ, रेल्वे स्टेशन रोड, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात समाजशास्त्र विषयाच्या अध्यापनातून दीर्घकाळ विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व सामाजिक जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. स्मिता अवचार यांनी “आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत समाजशास्त्र विषयाचे महत्त्व अधिक वाढले आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, मूल्ये आणि जबाबदारीची भावना विकसित करण्यासाठी समाजशास्त्राचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, तसेच एमपीएससी यूपीएससी मध्ये यश संपादन केलेले 45 टक्के विद्यार्थी हे समाजशास्त्र विषयातील आहेत.तेव्हा आज समाजशास्त्र विषयाचे महत्त्व वाढत आहे” असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयीन समाजशास्त्र परिषदेचे राज्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश खेत्री होते. कार्यक्रमास विभागीय मंडळाचे सहाय्यक सचिव श्री. दीपक कोकतरे, HSC विभाग प्रमुख श्रीमती शोभा पाळदे, लघुटंकलेखक व स्वीय सहाय्यक श्रीमती वत्सला टाकळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी प्रा. डॉ. स्मिता अवचार, श्रीमती संहिता रविंद्र कुलकर्णी, श्रीमती नूरजहा बेग, श्री. राजेंद्र राऊत, प्रा. दत्ता देशमुख, प्रा. डॉ. विद्या भिल्लारे, प्रा. किशोर घुनावत, प्रा. राजेंद्र सूर्यवंशी व प्रा. ज्ञानेश्वर घुले या मान्यवर प्राध्यापकांचा मानपत्र, शाल, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव प्रा. ज्ञानेश्वर घुले यांनी केले. सूत्रसंचालन विभागिय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले, तर मानपत्राचे वाचन उपाध्यक्षा प्रा. सीमा औटे व परभणी जिल्हाध्यक्ष प्रा. नारायण राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी कार्याध्यक्ष प्रा. डॉ. रामनाथ पवार यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी छत्रपती संभाजीनगर विभागाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र सूर्यवंशी, उपाध्यक्ष प्रा. सीमा औटे, सचिव प्रा. ज्ञानेश्वर घुले, कार्याध्यक्ष डॉ. रामनाथ पवार, सहकार्याध्यक्ष प्रा. किशोर घुनावत, तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. विजयकुमार रोडे यांनी विशेष प्रयत्न केले.
समाजशास्त्र विषयासाठी अनेक वर्षे निष्ठेने सेवा करणाऱ्या प्राध्यापकांचा सन्मान करून परिषदेनं एक आदर्श निर्माण केला असून अशा प्रेरणादायी उपक्रमांमुळे शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळत असल्याचे उपस्थितांनी मत व्यक्त केले.
कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. भारत खैरनार,प्रा. रंजना यपूरवार,प्रा. सविता पोकळे,प्रा.शेवाळे सर,प्रा. विश्वंभर म्हस्के,प्रा. अशोक उवाक,प्रा. गणेश चाळक,प्रा. नवलेश्वर केचनार,प्रा. परमेश्वर खेत्री,प्रा. माने सर
प्रा. नारायण राऊत,प्रा. देविदास राठोड, प्रा. अशोक उबाळे, प्रा. उषा मोटे, प्रा. शेख सर, प्रा. सविना पांडे ,प्रा. शेख एफ. एच.,प्रा. पाटील जी. ए.,प्रा. विश्वंभर मसके,प्रा. राम इंगळे आदी प्राध्यापकांची उपस्थिती होती.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel