नांदेड : नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत हिमायतनगर तालुक्यातील शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवन...
नांदेड : नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत हिमायतनगर तालुक्यातील शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मोंन्टी सिंह जहागीरदार यांनी केला आहे. या संदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांना निवेदन देण्यात आले असून शिक्षण विस्तार अधिकारी केशव मेकले यांच्या कार्यपद्धतीची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिमायतनगर शिक्षण विभागात केशव मैकाले यांनी काही शिक्षकांना हाताशी धरून वसुलीची टोळी तयार केली आहे. गणेश कोकुलवार, अरुण पाटील आणि पंडित तळेगाव कर यांच्यासह काही जणांकडून शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून विविध कामांसाठी पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, काही शिक्षकांना अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी विविध पदांचा पदभार देण्यात आला असून नियमांचे उघडपणे उल्लंघन होत आहे. तसेच निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षकांच्या पेन्शन फाईल्स अडकवून त्यांच्यावर दबाव टाकण्याचे प्रकारही सुरू असल्याचे मनसेने म्हटले आहे.
या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून केशव मेकले व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. अन्यथा येत्या आठ दिवसांत कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक आंदोलन छेडेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष मोंटी सिंह जहागीरदार यांनी दिला आहे. सबंधित अधिकारयाना याबाबत विचारना केली असता काहिही बोलन्यास नकार दिला

.jpeg)
COMMENTS