निवघा बाजार प्रतिनिधी दि. १३ नुकताच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे IBPS ने केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 चा राज्यस्तरीय नि...
निवघा बाजार प्रतिनिधी दि. १३ नुकताच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे IBPS ने केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 चा राज्यस्तरीय निकाल जाहीर केला. त्यामध्ये निवघा बाजार येथील रहिवासी प्राथमिक शिक्षक अमोल चंद्रशेखर भारती यांची जिल्हा परिषद हिंगोली येथे केंद्रप्रमुख म्हणून गुणवत्ता यादीत 152 गुण घेऊन निवड झाल्याची माहीती त्यांनी दिली.
बेलमंडळ जि. हिंगोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले अमोल भारती यांनी विद्यादाना सोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवत असतांना शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती परीक्षा , नवोदय परीक्षा अशा स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठी कायम प्रोत्साहीत करत एवढेच नाही तर अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी करत त्यांनी शाळेसोबतच गावाचे नाव उज्वल केले असल्याची माहिती गावकरी आवर्जुन सांगत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्या कर्मभूमी सोबतच जन्मभूमीत ही सर्वत्र कौतुक होत आहे .

COMMENTS