ग्राम विकास शिक्षण संस्था, चिखली ता. कंधार संचलित .... रत्नेश्वरी माध्यमिक विद्यालय, वडेपुरी येथे इयत्ता दहावीचे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे केंद्र(केंद्र क्रमांक - 5213) नव्याने मान्य झाले असून येथे शुक्रवार दिनांक, 20 फेब्रुवारी 2026 रोजी पासून राज्य मंडळाच्या परीक्षेची सुरुवात कॉपीमुक्त वातावरणात शांततेत झाली.
केंद्र संचालक म्हणून श्री चीवळे व्ही. एस. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सदरील परीक्षेसाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती लोहा यांच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे.
एकूण 266 विद्यार्थ्यांपैकी आज मराठी विषयाच्या पेपरला 258 विद्यार्थी उपस्थित होते. बैठे पथक, पोलीस कर्मचारी यांचीही उपस्थिती होती. अतिशय शांततेच्या वातावरणात आणि कॉपीमुक्त_भयमुक्त वातावरणात विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे आणि परीक्षेचे संचालन राज्य परीक्षा मंडळ आणि जिल्हा दक्षता समिती, नांदेड यांनी ठरवून दिलेल्या नियमानुसार कॉपीमुक्त वातावरणात, सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत तसेच झूम वेब कॉस्ट च्या माध्यमातून कॅमेरा शूटिंग मध्ये काटेकोरपणे परीक्षेचे संचालन होत आहे.
परीक्षेच्या पहिल्या दिवशी परीक्षा सुरू होत असताना परीक्षा केंद्रावर सर्व विद्यार्थ्यांना तपासणी करून केंद्रामध्ये प्रवेश देण्यात आला. प्रतिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन नवीन परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक- पदाधिकारी उपस्थित होते,अशी माहिती मुख्याध्यापक श्री रत्नाकर फुलारी यांनी दिली. परीक्षा केंद्रात आणि परीक्षा केंद्राबाहेर अतिशय शांतता आणि कॉपीमुक्तीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे परीक्षा केंद्र क्रमांक 5213 वर बैठे पथक यांनी समाधान व्यक्त केले.

COMMENTS