मुंबई: कोकण दीप मासिकाच्या २३ व्या वर्धापनदिनी बंधुत्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि मुंबई पोर्ट ट्रस्टमधील समाजसेवक समीर राणे यांना" समाजरत्न पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले.
दादर येथील मुंबई मराठी संग्रहालयात २२ जून २०२५ रोजी कोकण दीप मासिकाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात गृहराज्यमंत्री मा. श्री.योगेश रामदास कदम यांच्या हस्ते समीर राणे यांना पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दापोली विधानसभा शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर भाऊ कदम, गिरणी, कामगारांचे नेते प्रवीण घाग, विलास खानोलकर कोकणदीपचे संपादक दिलीप शेडगे व इतर मान्यवर उपस्थित होते.
गोदी विभागातून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सन्मानाने निरोप देणे, देहदान, रक्तदान, अवयवदान, नेत्रदान, त्वचादान, अस्थिदान, रुग्णसेवा देणे, याबद्दल जनजागृती करून संस्थेच्या वतीने समीर राणे यांनी अर्ज भरून घेतले. वृक्षारोपण करून त्याचे जतन केले. दरवर्षी दादर येथील शिवाजी पार्क चौपाटीवर गणपती विसर्जन केल्यानंतर सहकाऱ्यांसमवेत चौपाटी स्वच्छ करणे, दरवर्षी हुतात्मा चौकात हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहने. अशा अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असून,आजही ते निस्वार्थीपणे समाजाची सेवा करीत आहे. अशा अनेक विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांचा कोकण दीप मासिकाच्या वर्धापन दिनानिमित्ताने गुणगौरव करण्यात आला. समाजात चांगलं कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचे उत्तम कार्य कोकण दीपचे संपादक दिलीप शेडगे दरवर्षी करीत आहेत. त्यांचे सर्वांनीच कौतुक केले.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा