नवी मुंबईत बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बॉम्बे बंटस सेंटर, जुईनगर या ठिकाणी २२ जून २०२५ रोजी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आनंद गावडे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सभेस संस्थेचे उपाध्यक्ष भगवान शेटे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
दिपप्रज्वलनाने सभेची सुरुवात झाली.
याप्रसंगी बहुसंख्य सभासद, शाखा सल्लागार, विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध सहकारी बँकांचे पदाधिकारी, साईप्रेरणा को – ऑप क्रेडीट सोसायटीचे अध्यक्ष देवदास डोंगरे, पदाधिकारी व संचालक, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, यशोमंदिर सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी व संचालक, वेलॉक्स प्रा. लि चे सर्वेसर्वा श्री. मंगेश आमले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार ) मुंबई विभागाचे सरचिटणीस व प्रवक्ते गणेश मुळे, सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर सभेमध्ये सभासदांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शनपर भाषणे केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण खंडू आहेर यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्थेचे सर व्यवस्थापक संजय घोगरे यांनी सुंदर केले. संस्थेचा कारभार पारदर्शक असून संस्थेच्या प्रशासकीय कार्यालयासह १५ शाखा असून, उर्वरित मुंबई व नवी मुंबई विभागात २ नवीन शाखा सुरु करण्याचा मानस संचालक मंडळाने केला आहे. संस्थेचे खेळते भांडवल रु. १७५ कोटी असून संस्थेचा संमिश्र व्यवसाय रु. २६८ कोटी आहे, चालू आर्थिक वर्षात रु. ३०० कोटींपर्यंत संमिश्र व्यवसायाचा टप्पा गाठण्याचे ध्येय निश्चित केले आहे. सभासदांना १०% लाभांश जाहीर केल्याने सभासदांनी समाधान व्यक्त केले. संस्थेने विविध ठेव योजना, विविध कर्ज योजना सभासदांकरिता सुरु केल्या आहेत.
संस्थेमध्ये अनेक सभासदांनी वैद्यकीय व शिक्षण स्मृती ठेव योजनेमध्ये योगदान दिले असून वैद्यकीय व शिक्षण ठेव स्मृती योजनेमधून अनेक सभासदांना आर्थिक मदत केली जाते. सभासदांच्या पाल्यांचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा केला जातो. सभासद तसेच मान्यवरांनी केलेल्या भाषणामध्ये संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा