सेलू: येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन,परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन विद्यालयाच्या प्रांग...
सेलू: येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन,परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन विद्यालयाच्या प्रांगणात रविवार ( दि. २१ ) जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर,गटविकास अधिकारी उदय जाधव, पोलीस निरीक्षक अरूण नागरे, गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, प्रशासकीय अधिकारी तथा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा सचिव देविदास सोन्नेकर मुख्याध्यापक नरेंद्र पाटील, उल्हास पांडे, उपमुख्याध्यापक परसराम कपाटे यांची उपस्थिती होती. आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त उपस्थित शिक्षक, विद्यार्थी, पोलीस कर्मचारी, नागरिकांनी योगासन केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी केले. सुत्रसंचलन पर्यवेक्षक गणेश माळवे, क्रीडा शिक्षक प्रशांत नाईक यांनी केले. तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक किरण देशपांडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक शंकर बोधनापोड,क्रीडा शिक्षक किशोर ढोके, संजय भूमकर, डॉ.सुरेश हिवाळे, बाळू बुधवंत, बाबासाहेब गोरे, आनंद क्षीरसागर, प्रा. सत्यम बरकुले, वैभव रोडगे, अरूण रामपूरकर, केशव डहाळे, निर्मलाताई कांदळे यांनी यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.
राष्ट्रीय योगासन स्पर्धेतील खेळाडूंचा सत्कार
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने हनुमान प्रसारक मंडळ व बृहन्मुंबई महाराष्ट्र योग परिषद, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय योगासन क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त सहशिक्षिका शिल्पा बरडे, प्रतिज्ञा चव्हाण, सुश्मिता भरदम, लक्ष्मीकांत फटाले, विद्यार्थी शौर्य फटाले,सान्वी झाल्टे, काव्या राजवाडकर, सहभागी खेळाडू आशिका खराटे, ईश्वरी गाजरे, आराध्या भूजबळ, आराध्या आकाशे, आदीश्री आकाशे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
योग साधना मन,मेंदूस ऊर्जा देते
गजानन वाघमारे
स्वस्थ, आरोग्यदायी जीवनासाठी विद्यार्थी, शिक्षक, नागरिकांनी योगासन ही नियमित करावीत. योग साधना ही मन, मेंदूला सकारात्मक ऊर्जा देते. माणूस दिवसभर प्रसन्न मनाने कार्यरत राहातो. रोज योगासन केल्यास सर्व प्रकारचे आजार दूर होतात. असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांनी केले.

COMMENTS