नांदेड दि. 31 - राज्याभिषेकाच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी समितीतर्फे राज्याभिषेकाचा सोहळा दुर्गराज रायगडावर मोठ्या दिमाखात साजरा केला जातो...
नांदेड दि. 31 -
राज्याभिषेकाच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी समितीतर्फे राज्याभिषेकाचा सोहळा दुर्गराज रायगडावर मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. यंदाही हा सोहळा 5 ते 6 जूनला विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे.
छत्रपती शिवराय व राजर्षी शाहू महाराज यांचे वारसदार व अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे मार्गदर्शक युवराज छत्रपती संभाजीराजे व आईसाहेब संयोगिता राजे व शहाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडावर हा सोहळा साजरा होतो. यंदा शिवभक्तांचा आकडा पाच ते दहा लाखांवर जाण्याची शक्यता आहे. देशभरातून इतिहास संशोधक, अभ्यासक, शिवभक्त इतिहासप्रेमी उपस्थित राहणार आहेत. समितीतर्फे शिवभक्तांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. तसेच गडावर 5 ते 6 जूनला वैविध्यपूर्ण व कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समिती सदस्य दुर्गराज रायगड मंगेश पाटील कदम यांनी दिली आहे.
पहाटे रायगडावरील नगारखान्यासमारे भगवा ध्वज उभारुन राज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्याची सुरुवात होणार आहे. त्यांच्याच हस्ते मुख्य राज्याभिषेक सोहळा होणार आहे. त्यानंतर मुर्तीवर सुवर्णनाण्यांचा अभिषेक केला जाणार आहे. रणवाद्य हलगी, घुमक व कैताळाच्या कडकडाटात होळीच्या माळावर शिवकालीन युध्दकलेची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. या लोकोत्सवात भव्य पालखी सोहळा, छत्रचामरासह शिवछत्रपतींच्या प्रतिमेची शोभायात्रा हे खास आकर्षण असेल, पारंपारिक वेमभूषेत शिवभक्त सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यांना युवराज संभाजीराजे मार्गदर्शन करतील. दरम्यान महिला व पुरुषांची ढोल- ताशा पथके पुर्ण येथील रणवाद्य ढोल ताशा पथक व शंभूगर्जना ढोल ताशा पथक तसेच कोल्हापूर येथील नाद ढोल ताशा पथके सोहळ्यांमध्ये अकर्षण ठरणार असल्याची माहिती मंगेश पाटील कदम यांनी सांगितले.

COMMENTS