नांदेड:शिवसेनेच्या 'मशाल' चिन्हावर निवडून येऊन मतदारांशी आणि पक्षाशी बेइमानी करणारे खासदार हे कोणत्याही 'ऑपरेशन टायगर'चे शिल...
नांदेड:शिवसेनेच्या 'मशाल' चिन्हावर निवडून येऊन मतदारांशी आणि पक्षाशी बेइमानी करणारे खासदार हे कोणत्याही 'ऑपरेशन टायगर'चे शिलेदार नसून ते केवळ 'ऑपरेशन लुच्चेगिरी'ला बळी पडले आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य महानगरप्रमुख प्रकाश मारावार यांनी केली आहे. ६ खासदारांचा गट स्थापन करून त्याला 'ऑपरेशन टायगर'चे नाव देणे म्हणजे हास्यास्पद असून, हा निव्वळ राजकीय स्वार्थ असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.
ठाकरे ब्रँड'चा रुतभा कमी करण्याचा डाव
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 'मातोश्री' आणि 'ठाकरे ब्रँड'चा असलेला दबदबा आणि रुतभा कमी करण्यासाठीच ही सर्व खेळी रचली गेल्याचा आरोप मारावार यांनी केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या निशाणीवर म्हणजेच 'मशाल' चिन्हावर जनतेने या खासदारांना निवडून दिले होते. मात्र, त्यानंतर केंद्रीय यंत्रणांचे ब्लॅकमेलिंग, विविध आमिषे आणि दबावाचा वापर करून या खासदारांना ठाकरे पक्षापासून दूर करण्यात आले, असे मारावार म्हणाले.
...तर आधी राजीनामे देऊन निवडून आणून दाखवा!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधत प्रकाश मारावार यांनी नारायण राणे यांच्या बंडखोरीचा दाखला दिला. ते म्हणाले,
"ज्या नेत्याने हे ऑपरेशन राबवले, त्यांनी नारायण राणे यांचा आदर्श घ्यायला हवा. नारायण राणे यांनी ज्यावेळी शिवसेना सोडली, त्यावेळी त्यांनी आपल्यासोबतच्या १३ आमदारांचे तातडीने राजीनामे घेऊन त्यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आणि स्वबळावर निवडून आणले होते. जर मुख्यमंत्र्यांमध्ये आणि शिंदे गटात हिंमत असेल, तर त्यांनी मशाल चिन्हावर निवडून आलेल्या या खासदारांचे आधी राजीनामे घ्यावेत आणि त्यांना पुन्हा जनतेच्या दारात नेऊन निवडून आणून दाखवावे. जर ते पुन्हा निवडून आले, तरच त्या प्रक्रियेला 'ऑपरेशन टायगर' हे नाव शोभेल."
'इतरांचे पोरं कडेवर घेऊन नाचणे म्हणजे टायगर नव्हे'
दुसऱ्यांच्या चिन्हावर आणि नावावर निवडून आलेले लोक आपल्या पक्षात ओढून हुशारी मारणे म्हणजे 'इतरांचे पोरं कडेवर घेऊन नाचण्यासारखे' आहे. याला पराक्रम म्हणत नसून ही निव्वळ 'ऑपरेशन लुच्चेगिरी' आहे. ६ खासदारांचा गट वेगळा केला म्हणजे तुम्ही वाघ होत नाही. येणारा काळच आता ठरवेल की खरा 'टायगर' कोण आणि 'लुच्चा' कोण? अशा शब्दांत प्रकाश मारावार यांनी शिंदे गटात गेलेल्या खासदारांचा आणि सत्ताधाऱ्यांचा तीव्र शब्दात समाचार घेतला. या राजकीय घडामोडींमुळे मतदारांमध्ये तीव्र संताप असून जनता निवडणुकीत या बेइमानीचे चोख उत्तर देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

COMMENTS