नांदेड :-
ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ञ डॉ. सुरेश सावंत यांना नुकताच राष्ट्रीय स्तरावरील साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या यशाबद्दल नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी डॉ. सुरेश सावंत यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपालसिंग संधू, सहायक आयुक्त गुलाम सादेक, मनपा शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी, रमेश चौरे यांची उपस्थिती होती.
शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी आपल्या प्रास्ताविकात डॉ. सुरेश सावंत यांच्या बालसाहित्य व बालशिक्षणाच्या क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. महापालिकेच्या वतीने आपला सन्मान करताना आम्हाला सार्थ अभिमान आणि आनंद झाला आहे, अशी भावना आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी डॉ. सुरेश सावंत यांच्याशी त्यांच्या वाडमयीन वाटचालीबद्दल मनमोकळेपणाने चर्चा केली. डॉ. सुरेश सावंत यांनीही महापालिकेच्या वतीने आपला सन्मान होणं हा निश्चितच आनंद देणारा क्षण आहे अशी भावना व्यक्त केली.
addComments
टिप्पणी पोस्ट करा