१ली "आदित्य चषक" १८वर्षाखालील मुले व मुली राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा - पुणे*

      *पुणे ग्रामीण मुलींमध्ये, परभणी मुलांमध्ये अंतिम विजेते*. परभणी (क्रीडा प्रतिनिधी):- पुणे ग्रामीण यांनी मुलांत, तर परभणी  यांनी मुलांत...

     



*पुणे ग्रामीण मुलींमध्ये, परभणी मुलांमध्ये अंतिम विजेते*.

परभणी (क्रीडा प्रतिनिधी):- पुणे ग्रामीण यांनी मुलांत, तर परभणी  यांनी मुलांत " १ल्या आदित्य चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेते" विजेतेपद पटकावले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. व पुणे जिल्हा कबड्डी असो. च्या मान्यतेने आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशक्ती महिला संघाने या सामन्याचे आयोजन केले होते. पुणे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील मॅट वर झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात पुणे ग्रामीणने पिंपरी चिंचवड संघाचा प्रतिकार चुरशीच्या लढतीत ३३-३२ असा संपवत जेतेपद पटकाविले. आक्रमक सुरुवात करीत पिंपरी चिंचवडने पहिला लोण देत १२-०३ अशी भक्कम आघाडी घेतली. पूर्वार्धात १७-०७ अशी आघाडी होती. पण उत्तरार्धात डाव पलटी झाला. पुणे ग्रामीण संघाने उत्तरार्धात जोरदार कम बॅक करीत शेवटच्या काही मिनितात २४-२४ अशी बरोबरी साधली. शेवटी लोण देत २८-२६ अशी आघाडी घेत १गुणाने बाजी मारली. वर्षा बनसडे, सई शिंदे यांच्या कल्पक चढाया त्यांना सानिका वाकसे ची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हा विजय शक्य झाला. संतोषी थोरवे, कार्तिक घेरवे यांच्या चढाया उत्तरार्धात कमी पडल्या. सानिका पांडुरे हिचा बचाव ही कमी पडला. म्हणून पिंपरी चिंचवडला निसटत्या पराभवाला सामोरी जावे लागले.

मुलांच्या अंतीम सामन्यात परभणीने औरंगाबाद वर ४१- २१ असा सहज पराभव करीत जेतेपदावर आपले नाव कोरले. विश्रांतीपर्यंत चुरशीने खेळलेल्या या सामन्यात परभणी कडे १८- १२ अशी आघाडी होती. पूर्वार्धात एक व उत्तरार्धात २ लोण देत परभणीने हा विजय सोपा केला. सारंग रोकडे, किशोर जगताप यांच्या आक्रमक चढाया त्यांना सोमेश्वर खोपे, जीवन जाधव यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हे शक्य झाले. औरंगाबादच्या नागेश पवार, विराज राठोड, शुभम गवळी यांच्या प्रतिकार उत्तरार्धात कमी पडला.

या अगोदर झालेल्या मुलींच्या उपांत्य सामन्यात पिंपरी चिंचवडने मुंबई उपनगर पूर्वेचे आव्हान ३०-२५ असे संपविले. मध्यांतरापर्यंत चुरशीने खेळलेल्या या सामन्यात १६-१२ अशी आघाडी पिंपरी चिंचवड कडे होती. ज्ञानेश्वरी लांडे, संतोषी थोरवे, डिंपल पिंपरी चिंचवड कडून, तर तन्वी बारगडे, भैरवी म्हात्रे, पूजा चिंदरकर उपनगर कडून उत्कृष्ट खेळले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात पुणे ग्रामीणने जालन्याला ३२-१९ असे नमवित अंतिम फेरी गाठली. सई शिंदे, सुहानी माने, सानिका वळसे पुणे ग्रामीण कडून, तर मोनिका पवार, कल्याणी शिंदे जालना कडून उत्तम खेळले. मुलांच्या उपांत्य सामन्यात परभणीने पिंपरी चिंचवडला ४८-३७ असे, तर औरंगाबादने जळगांवला ४०-३७ असे नमवित अंतिम फेरीत धडक दिली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण खासदार व दैनंदिन सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या हस्ते झाले. तद्प्रसंगी स्पर्धा आयोजक सचिनभाऊ अहिर, सुषमा अंधारे, ॲड. अनिल परब, आदित्य शिरोडकर, राज्य कबड्डी संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे, खजिनदार मंगल पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel