डॉ. सुरेश सावंत यांच्या घरी जाऊन पालकमंत्री व अशोकरावांनी केला सत्कार*


नांदेड, दि. २० जून 

ज्येष्ठ साहित्यिक तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या 'आभाळमाया' या कवितासंग्रहाला साहित्य अकादमीचा  बालसाहित्याचा पुरस्कार मिळाल्याबद्दल पालकमंत्री ना. अतुल सावे आणि माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी आज त्यांच्या घरी जाऊन डॉ. सावंत यांचा सपत्नीक सन्मान केला.

दोन दिवसांपूर्वीच डॉ. सुरेश सावंत यांना हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. तेव्हापासून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अतुल सावे आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने नांदेड शहरात आले असता खा. अशोकराव चव्हाण यांनी डॉ. सुरेश सावंत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन करण्याची सूचना मांडली.  त्या सूचनेला पालकमंत्र्यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत डॉ. सुरेश सावंत यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. बैठक संपताच शासकीय वाहनांचा भला मोठा ताफा डॉ. सावंत यांच्या शाहूनगरातील निवासस्थानाकडे रवाना झाला. यामध्ये पालकमंत्री ना. सावे आणि खा. अशोकरावांसह खा. डॉ. अजित गोपछडे, भारतीय जनता पक्षाचे नांदेड महानगराध्यक्ष, माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली आदींचा समावेश होता. 

पालकमंत्र्यांना परिचय करून देताना खा. अशोकराव चव्हाण यांनी डॉ. सुरेश सावंत हे ४० वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व साहित्य चळवळीत अग्रणी असल्याचे सांगितले. त्यावर डॉ. सुरेश सावंत यांनी डॉ. शंकरराव चव्हाण हे संस्कारांचे विद्यापीठ होते आणि मी त्या विद्यापीठाचा विद्यार्थी आहे, असे सांगितले. शंकररावांच्या जीवनकार्यावर लिहिलेले 'जलशंकर', 'आधुनिक भगीरथ' व 'महाराष्ट्राचे शिल्पकार' तसेच 'भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी' हे चार ग्रंथ डॉ. सावंत यांनी पालकमंत्री अतुल सावे यांना भेट दिले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही यावेळी डॉ. सुरेश सावंत यांना एक पुस्तक भेट दिले. सर्व उपस्थित मान्यवरांनी डॉ. सुरेश सावंत यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.

टिप्पण्या
Popular posts
योद्धा जेव्हा शरण येत नाही तेव्हा तो बदनाम केला जातो ; महेबूब भाई आम्ही तुमच्या सोबत आहोत ! - शेख फेरोज
इमेज
उमरी तालुक्यातील बोरजूनी येथे प्रेम प्रकरणातून प्रियकर व मुलींची वडिलांकडून हत्या
इमेज
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या विजयी उमेदवारांना दिल्या शुभेच्छा*
इमेज
डाॅ.लोपामुद्रा,आपण महाराष्ट्र पोलीस दलाचीच नव्हे तर भारतीय पोलीस दलाची "डाॅ.विजश्री लोपामुद्रा" आहात!...डाॅ.हंसराज वैद्य...*
इमेज
राज्यस्तरीय सेपकटाकरॉ स्पर्धेचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते उद्घाटन
इमेज