*जहाजावरील क्षेपणास्त्राच्या हल्ल्यातील सागरी कामगार सुरक्षितपणे मुंबईत*

मुंबई - यमनजवळ यंदा झालेल्या एका भीषण घटनेनंतर एसा स्टार जहाजावरील सर्व भारतीय सागरी कामगार सुरक्षितपणे मुंबईत परतले आहेत. ५ डिसेंबर २०२४ रो...





मुंबई - यमनजवळ यंदा झालेल्या एका भीषण घटनेनंतर एसा स्टार जहाजावरील सर्व भारतीय सागरी कामगार सुरक्षितपणे मुंबईत परतले आहेत. ५ डिसेंबर २०२४ रोजी या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला झाला होता, ज्यामुळे रेड सी प्रदेशातील तणाव वाढल्याचे दिसून आले. सागरी कामगारांना यशस्वीरीत्या  सुरक्षितपणे आणल्याचे  श्रेय नॅशनल युनियन सिफेरर्स ऑफ इंडिया (NUSI) आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक कामगार महासंघ (ITF) यांच्या नेतृत्वाखालील धाडसी व्यवस्थापकीय प्रयत्नांना जाते. या संस्थांनी सागरी कामगारांना त्यांच्या कुटुंबियांपर्यंत सुरक्षित पोहोचवण्यासाठी अहोरात्र काम केले.  आपल्या सागरी कामगारांना  सुरक्षितपणे परत आणले, ही नुसीसाठी सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे,” असे  नुसीचे जनरल सेक्रेटरी व खजिनदार मिलिंद कांदळगावकर यांनी सांगितले.

 “आंतरराष्ट्रीय समुद्री सहकार्याच्या प्रभावीपणे केलेल्या कार्याचे हे यशस्वी उदाहरण आहे.” यमन किनाऱ्याजवळील जहाज वाहतुकीच्या मार्गांवर वाढत्या हल्ल्यांपैकी एसा स्टारवरील   हा एक भीषण हल्ला होता. या घटनेमुळे व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसंबंधीचा धोका निर्माण झाला आहे..

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर परतणाऱ्या सागरी कामगारांचे त्यांच्या कुटुंबियांनी भावनिक स्वागत केले. त्याठिकाणी वैद्यकीय पथक तत्पर होते, परंतु प्राथमिक अहवालांनुसार  सर्व कामगारांची प्रकृती चांगली असून ते सुरक्षित  आहेत. सागरी कामगार संघटनां  आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे  सागरी कामगारांना मुंबईत सुरक्षितपणे  परत आणून कामगारांच्या हक्कांचे व सुरक्षिततेचे रक्षण करण्यामध्ये  महत्त्वपूर्ण योगदान आहे. तसेच, संकटग्रस्त समुद्री मार्गांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सावधगिरी व आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज अधोरेखित केली आहे.  किनाऱ्यावर सुरक्षित आलेल्या सागरी कामगारांच्या कुटुंबियांनी परत आणण्यासाठी  सहभागी झालेल्या सर्व संस्थांचे आभार मानले. “आमच्या प्रिय व्यक्तींना सुरक्षितपणे घरी परत आणले. हा आमच्यासाठी मोठा दिलासा आहे,” असे एका कुटुंबीयाने सांगितले. “या कठीण काळात NUSI व ITF कडून मिळालेला पाठिंबा अनमोल होता.”

या घटनेनंतर, विशेषत: समुद्री संघर्षग्रस्त भागांमध्ये  सुरक्षा उपाय अधिक प्रभावी करण्यासाठी पुन्हा एकदा सुरक्षेची मागणी वाढली आहे. व्यापारी जहाजांच्या सुरक्षिततेसाठी समुद्री प्राधिकरणे सद्यपरिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group