*छत्तीसगड येथील शालेय राष्ट्रीय बेसबॉल क्रीडा स्पर्धेत विठ्ठल बोरसे ला कांस्यपदक*

सेलू (.                )भारतीय शालेय खेल महासंघाच्या वतीने 68 व्या बेसबॉल 14 वर्ष मुले /  राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन  बिलासपूर(छत्तीसगड) येथे दिनांक 19 ते 22 डिसेंबर 2024 दरम्यान  संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा संघांनी कांस्यपदक विजेता ठरला. महाराष्ट्र संघाचा नेतृत्व नूतन विद्यालयाचा विठ्ठल अजयकुमार बोरसे हा खेळाडू करत महाराष्ट्र राज्य संघास कांस्यपदक विजेता ठरला.

      १४ वर्षे मुले महाराष्ट्र राज्य संघाने आंध्रप्रदेश, विद्या भारती,या संघास साखळी सामन्यात बाद करून  उपांत्यपूर्व फेरीत पंजाब संघास १० रन पराभूत करून, उपांत्य फेरीत दिल्ली  संघा सोबत महाराष्ट्र संघ ०५ रन पराभूत होऊन, कांस्यपदक साठी चंदिगड वि महाराष्ट्र सामन्यात महाराष्ट्र संघाने ०६ चंदिगड चा पराभव करत कांस्यपदक पटकावले.

        या खेळाडूला मार्गदर्शक प्रशांत नाईक, प्रशिक्षक संजय भूमकर, कुणाल चव्हाण , निलेश माळवे, सत्यम बरकुले यांचे मार्गदर्शन मिळाले 

या उज्वल यशाबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया उपाध्यक्ष डी. के. देशपांडे , सचिव डॉ. व्हि.के.कोठेकर , सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, क्रीडा उपसंचालक विजय संतान ,जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे जयकुमार टेंभरे ,संजय मुंडे सुरेश नाटकर ,मुख्याध्यापक संतोष पाटील, किरण देशपांडे, रोहिदास मोगल ,क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे, चेतन पानझडे, बोरसे परीवार सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले

टिप्पण्या