नांदेड:( दि. १६ जून २०२६)
महानुभव साहित्याचे अभ्यासक डॉ. संजय जगताप लिखित 'सर्वज्ञ संचित' या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा दि. १४ जून रोजी यशवंत महाविद्यालयाच्या ग्रंथालयात थाटात संपन्न झाला. हा ग्रंथ सायास पब्लिकेशन, नांदेड यांनी प्रकाशित केला आहे.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तथा बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमतचे प्राचार्य डॉ. मा. मा. जाधव होते. ते म्हणाले की, श्री चक्रधरांच्या सूत्रांचा विचार आणि कृती वर्तमान काळातील जीवन प्रवासाशी सुसंगत बनविणे, हे लेखकाचे काम असते आणि ते डॉ.संजय जगताप यांनी व्यवस्थित पार पाडले आहे. या प्रसंगी उत्तर प्रदेश येथील डी. लीट पदवी प्राप्त विचारवंत, महानुभाव साहित्याचे व्यासंगी अभ्यासक डॉ. बाबासाहेब बीडकर यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन झाले.
प्रारंभी प्रास्ताविक संयोजन समिती सदस्य डॉ. माधव जाधव यांनी केले. याप्रसंगी लेखक डॉ. संजय जगताप यांनी ग्रंथाच्या निर्मितीविषयी भूमिका सविस्तर विशद केली. यानंतर दिल्ली येथील आय. आर. एस. प्रशासकीय अधिकारी अंकेत जाधव, मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपुर येथील अधिष्ठाता डॉ. कोमल ठाकरे, अमरावती येथील महानुभाव साहित्याचे अभ्यासक प्रा. संदीप तडस व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या चक्रधर स्वामी अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ.भारतभूषण शास्त्री यांनी ग्रंथावर समयोचित भाष्य केले.
समकाळातील या ग्रंथाचे महत्त्व, या ग्रंथातील सामर्थ्य स्थळे, लेखकाचा दृष्टिकोन आणि वाचकांनी हा ग्रंथ का वाचावा, याबद्दल अभ्यासपूर्ण मांडणी केली.
या चिंतनशील ग्रंथाची निर्मिती केल्याबद्दल डॉ. संजय जगताप यांचे डॉ. बाबासाहेब बिडकर यांनी कौतुक केले व हा ग्रंथ महत्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. मा.मा. जाधव यांनी, अशा ग्रंथाची निर्मिती करण्यासाठी लेखकाचा विषयाचा अभ्यास व विशिष्ट भूमिका असावी लागते आणि धाडस देखील असावे लागते. प्रसंगी असे विचार रुजवण्यासाठी त्याची किंमतही मोजावी लागते. ते धाडस संजय जगताप यांनी केले आहे.
सूत्रसंचालन डॉ. शारदा कदम यांनी केले तर आभार सौ. छाया जगताप यांनी मानले. समारंभाच्या यशस्वीतेसाठी डॉ. कमलाकर चव्हाण, डॉ. हंसराज जाधव, डॉ. सूर्यप्रकाश जाधव, डॉ.व्यंकटी पावडे, प्रा. रामदास बोखारे तसेच सायास प्रकाशनाचे डॉ. सौरभ जाधव, अत्रेय जगताप आदींनी परिश्रम घेतले तसेच माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे, ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे, डॉ.अजय गव्हाणे, संजय भोळे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक गजानन पाटील यांनी सहकार्य केले. सोहळ्यास डॉ. श्रीनिवास पांडे, डॉ.अनंत राऊत, डॉ.विश्वाधार देशमुख, डॉ.विजय भोसले, प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील, तानाजी हुसेकर, डॉ. डी. डी.पवार, प्रा.नारायण शिंदे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ.अजय मुठे, डॉ.शिवराज बोकडे, डॉ.शिवाजी सूर्यवंशी, डॉ.शंकर विभुते, डॉ.नारायण शिवशेट्टे, प्रा. महेश मोरे आदींसह श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

COMMENTS