भारत सरकारतर्फे प्रदीप नलावडे यांची मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर म्हणून नियुक्ती*

मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी विभागातील गोदाम अधीक्षक व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष श्री. प्रदीप भगवंतराव नलावडे यांची यूनियनच्या शिफारशीनुसार भारत सरकारने मुंबई पोर्ट प्राधिकरणावर बोर्ड मेंबर म्हणून नियुक्ती केली आहे.  

मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर श्री. दत्ता खेसे यांच्या सेवानिवृत्तीनंतर गोदाम अधीक्षक श्री. प्रदीप नलावडे यांची युनियनच्या शिफारशीनंतर केंद्र सरकारने ताबडतोब नियुक्ती केली आहे.

 प्रदीप नलावडे युनियनचे निष्ठावंत व सामाजिक कार्यकर्ते असून, गोदी विभागातील पूजा समितीचे पदाधिकारी आहेत.वनवासी कल्याण आश्रम व इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य चालू असते. 

 प्रदीप नलावडे यांचे युनियनचे सर्व पदाधिकारी, कमिटी मेंबर, सदस्य तसेच सर्व गोदी कामगारांतर्फे हार्दिक अभिनंदन!

आपला 

मारुती विश्वासराव 

प्रसिद्धीप्रमुख 

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन.

टिप्पण्या