नांदेड:(दि.९ ऑक्टोबर २०२५)
यशवंत महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाद्वारे प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान पीएम-उषा योजना पुरस्कृत ' एमरजिंग फ्रंटियर्स इन बायोसायन्सेस: रिसर्च ट्रेंड्स अॅण्ड इनोव्हेशन (ईएफबीआरटीआय:२०२५) या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे दि.११ ऑक्टोबर २०२५, शनिवार रोजी डॉ. शंकररावजी चव्हाण स्मृती संग्रहालयात आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे माजी कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण राज्यमंत्री व श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. श्री.डी.पी.सावंत, सहसचिव माजी प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर, कोषाध्यक्ष अँड. उदयराव निंबाळकर आणि माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
राष्ट्रीय परिषदेत डॉ. एम. माधवी, हैदराबाद, डॉ.माया गुप्ता, मुंबई, डॉ.चंद्रशेखर हिवरे आणि डॉ. गुलाब खेडकर,छत्रपती संभाजीनगर या तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
यावेळी संबंधित विषयावर संपादित ग्रंथाचे विमोचन होणार असून या ग्रंथात जवळपास १११ संशोधन पेपर आहेत. परिषदेसाठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, हरियाणा, गुजरात इत्यादी घटक राज्यातून एकूण दोनशे पंचावन्नपेक्षा अधिक प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
तरी या राष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन निमंत्रक व मुख्य आयोजक प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, संघटक सचिव प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ.संजय शामराव नंनवरे, सहसंघटक सचिव डॉ. एच. एल. तमलुरकर, डॉ.मंगल कदम, डॉ.नीताराणी जयस्वाल, डॉ. धनराज भुरे आणि संघटन समिती सदस्य डॉ. बी. बालाजीराव, डॉ.दीप्ती तोटावार, प्रा. नारायण गव्हाणे, प्रा. साहेबराव माने यांनी केले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा