मुंबई : मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या मरीन खात्यामधील इंदिरा गोदीतील शोअर सारंग मोतीराम देवचंद्र कोळी हे १ ऑगस्टपासून मुंबई पोर्ट ट्रस्टमधून ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवे नंतर निवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांचा ३१ जुलै २०२५ रोजी इंदिरा गोदीत शोअर व फ्लोटिला कामगारांच्या वतीने जाहीर सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला. मोतीराम कोळी हे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे धडाडीचे कार्यकर्ते होते. त्यांनी सेवा कालावधीमध्ये युनियनच्या माध्यमातून मुंबई पोर्ट प्रशासनाकडे पाठपुरावा करून अनेक कामगारांना बढती मिळून दिली. सेवा कालावधीमध्ये कामगारांचे सेवानिवृत्ती कार्यक्रम, दत्त जयंती,आंबेडकर जयंती सारखे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी खात्यामध्ये कामगारांच्या सहकार्याने राबविले. गोदी कामगारांच्या प्रत्येक आंदोलनात मरीन खात्यातील कामगार नेहमीच अग्रभागी असतात. त्यामध्ये मोतीराम कोळी यांचा देखील सहभाग होता. वरळी गावातील अनेक सामाजिक संस्थांमध्ये मोतीराम कोळी हे कार्यरत आहेत. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्पलॉइज युनियनच्या वतीने मोतीराम कोळी यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मुंबई पोर्टमधील सेवाकार्य, वरळी गावातील सामाजिक कार्य, मुंबई पोर्टमधील सद्यस्थिती यावर आधारित युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल, युनियनचे सेक्रेटरी व माजी बोर्ड मेंबर दत्ता खेसे, युनियनचे पदाधिकारी अहमद काझी, मारुती विश्वासराव, मीर निसार युनूस, संतोष कदम, शरद पेवेकर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन करून मोतीराम कोळी यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. अशोक माळवी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सत्कार सोहळ्याप्रसंगी कामगारांनी व नातेवाईकांनी भेटवस्तू देऊन मोतीराम कोळी यांचा सत्कार केला. सत्काराला मरीन खात्यातील गोदी कामगार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा