मेघना कावली नांदेडच्या मुख्यकार्यकारी अधिकारी



नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांची जळगाव जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर किनवट येथील एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती मेघना कावली यांचे नियुक्तीचे आदेश नुकतेच निघाले आहेत. नंादेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर मागील दीड वर्षाखाली मिनल करणवाल यांची नियुक्ती झाली होती. मंगळवारी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. अचानक निघालेल्या या बदलीच्या आदेशामुळे अनेकांना आश्चर्य वाटू लागले आहे. त्यांच्या जागेवर किनवट येथील प्रशिक्षणार्थी असणाऱ्या प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदीवासी प्रकल्प तथ सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट मेघना कावली यांच नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बदली केल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत 
टिप्पण्या