मुखेड (विठ्ठल कल्याणपाड)
मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा (बु) ता. मुखेड येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विविध योजना कार्यक्रम स्वच्छता, आरोग्य सेवा, शुद्ध पाणीपुरवठा, समृद्ध गाव योजना अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले." यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे, त्यांना स्पर्धात्मक वातावरणातून नवीन उर्जा देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, आठ कलमी कार्यक्रम योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविणे, यासाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षापासून "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायत कार्यालय आंबुलगा (बु.खु) ता. मुखेड येथे दिनांक 10/1/2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज वॉर रूम चे गावातील ज्येष्ठ नागरिक गोविंद सोनकांबळे यांच्या हस्ते रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी सुनील कोकनारे, सरपंच (प्र) बालाजी रॅपनवाड, उपसरपंच शरद पाटील, संगणक परिचालक शैलेश गंदिगुडे, रोजगार सेवक शंकर कल्याणपाड, ग्रामपंचायत कार्यालयाचे सर्व कर्मचारी गावातील नागरिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

addComments
टिप्पणी पोस्ट करा