सताधारी संचालक मंडळाने कोणतेही ठराव पारीत न करता केले सभेतून पलायन
-
नांदेड :( वार्ताहार ) *सहकारी शिक्षण पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सत्ताधाऱ्यांनी श्रीकृष्ण मंगल कार्यालय नांदेड येथे प्रचंड गदारोळात गुंडाळली. सताधाऱ्यांनी बेकायदेशीररित्या नियमबाहय पद्धतीने नौकर भरती करुण करोडो रुपयांची माया जमा केली हा कळीचा मुद्दा सभासदांनी उचलून धरला.गोंधळलेल्या चेअरमन व सताधारी संचालकांना सभासदांच्या एकाही प्रश्नाचे समाधानकारक उतर देता आले नाही.*
सत्ताधाऱ्यांनी केलेली नियमबाह्य नौकर भरती,रिकाम्या भूखंडावर अनावश्यक बांधकाम करणे,संपूर्ण कर्जाला सुरक्षा असताना केवळ कमिशनसाठी खाजगी कंपनीकडून सभासदांचा विमा उतरवणे व पतसंस्था स्वभांडवली असताना दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेवून पतसंस्था परावलंबी करण्याच्य आमसभेतील नियोजित ठरावाला विरोध दर्शवण्यासाठी प्रथम सत्रात आमसभा चालू होण्या अगोदरच जिल्ह्यातीत पाचशे सभासदांनी निषेधाचे फलक हातात घेवून व कर्मचारी भरती अमान्य, इमारत बांधकाम अमान्य असं लिहीलेल्या निषेधाच्या टोप्या घालून प्रवेशद्वारावरच मान्यवराच्या प्रवेशावेळी निदर्शने केली..*
*द्वितिय सत्रामधे विषय सूची नुसार सभेला सुरुवात झाली.मागील वर्षीच्या आमसभेमधे नौकर भरतीचा विषय हा विषय पत्रिकेवर न घेता आयत्या वेळच्या विषयात घेवून नियमबाह्य नौकर भरती केल्यामुळे मागील वर्षीच्या इतिवृत्त मंजूरीचा विषय आमसभेत नामंजूर असल्याचे सभासद बालाजी बामणे यानी मांडला त्यास डी एम पांडागळे, व्यंकट गंदपवाड,राजेंद्र पाटील यानी अनुमोदन दिले सभागृहातील बहुतांश सभासदाने मागील आमसभेचे इतिवृत नामंजूर केले,यावर गुप्त मतदान घेण्याची मागणी केली. परंतू गोधंळतेल्या सताधाऱ्यानी ठराव विरोधात जात आहे हे लक्षात आल्यामुळे सभेत गोंधळ घातला. चेअरमन व सत्ताधारी संचालकांनी विषय पत्रिकेतील विषय सभागृहात न मांडता सभा गुंडाळून पलायण केले. कोणतेही ठराव सम्मत न करता सभा गुंडाळण्यात आली. यामुळे प्रचंड गोंधळ सभागृहांमध्ये निर्माण झाला यानंतर सभासदांनी सर्वसाधारण सभा ताब्यात घेऊन विषय पत्रिकेत ठेवलेले विषय अमान्य केले. गोंधळून गेलेल्या सत्ताधाऱ्यांनी सभागृहातून पळ काढून सभासदांचा विश्वासघात केला संघर्ष समितीच्या वतीने याबाबत तीव्र निदर्शने करून सभासदानी सत्ताधारी संचालक मंडळाचा निषेध व्यक्त केला व या सभेसाठी आलेली लोकप्रतिनिधी खासदार आमदार महोदयांना निवेदन देऊन पतसंस्थेच्या कारभाराचा निषेद्ध करण्यात आला.आज झालेल्या आमसभेत भ्रष्ट कारभाराच्या व अनियमिततेच्या विरोधात सताधाऱ्यांना सभासदांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. आजच्या आमसभेत मागील सभेचे इतिवृत्त अमान्य करण्यात आले व आजचा एकही ठराव सम्मत न झाल्यामुळे मा जिल्हा उपनिबंधकाच्या उपस्थितीत विशेष आमसभा घेण्यात यावी असी मागणी संघर्ष समितीचे अध्यक्ष बालाजी बामणे,शिक्षक परिषदेचे प्रांत प्रांतप्रवक्ते दत्तप्रसाद पांडागळे, विभागीय अध्यक्ष संजय कोठाळे,शिक्षक संघाचेनेते निळकंठ चोंडे,परिषदेचे जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड,शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष विठ्ठल चव्हाण,जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कुणके, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष शंकर हासगुळे, रमेश घुमलवाडपरिषदेचे विभागीय उपाध्यक्ष राजेंद्र पाटील,अजित केंद्रे, जिल्हानेते अशोक पाटील बावणे, दिगंबर पा कुरे,केंद्रप्रमुख शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल आचणे,माध्यमिकचे शिक्षक संघटनेचे नेते दिगंबर मांजरमकर, माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष वैजनाथ हंगरगे, सल्लागार वैजनाथ मिसे, संचालक तथा शिक्षक परिषदेचे जिल्हाकार्यवाह प्रल्हाद राठोड,समता पतपेढीचे अध्यक्ष आनंद पवार,पती-पत्नी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत भिंगोले,परिषदेचे कोषाध्यक्ष बाळासाहेब पांडागळे,जिल्हा प्रवक्ता रवि ढगे,जिल्हाकार्यालयीण सचिव बळवंत मंगनाळे,जिल्हा संपर्कप्रमुख विश्वनाथ पाटील, संघटनमंत्री संजय मोरे,कार्याध्यक्ष बालाजी पांपटवार,गंगाधर तोडे,अशोक पाटील सकनुरकर, सतिश पाटील,जिल्हा उपाध्यक्ष गिरीश गरुडकर,मिथून मंडलेवार, शिवशंकर बोडके,पदाधिकारी व्यंकट आक्केमोड, संजीव मानकरी,भगवान बकवाड,दिपक गाढवे, शिक्षक भारतीने अमोल कुलकर्णी, परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख विठूल मुखेडकर, एस एस पाटील, पांडूरंग दिनकर,रघुवीर ठाकुर,दिगंबर बोइनवाड यासह हजारो सभासदानी केली आहे.*
सर्वसाधारण सभेमध्ये ठेवलेले विषय पतसंस्था व सभासदांच्या हिताचे नसल्याने व सत्ताधारी संचालक मंडळाने केलेली नियमबाह्य कर्मचारी भरती यामुळे सभासदांचा प्रचंड रोष सत्ताधारी संचालक मंडळावर आहे.याचे कारण असेही गेल्या अनेक वर्षापासून रिक्त जागा असताना. सत्ताधारी संचालक मंडळाने कर्मचारी भरती केली. पतसंस्थेमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असताना, पतसंस्था संगणकिकृत असताना भरती केली.भरतीमुळे सभासदांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे.पतसंस्थेची सुरक्षा कवच योजना असताना अपघात विमा योजना खाजगी विमा कंपनीला देऊन पतसंस्थेला 28 लाखांचा भुर्दंड बसलेला आहे.यादरम्यान तीन मयत सभासद होऊनही अद्याप पर्यंत त्यांना लाभ मिळालेला नाही. याच्यावरही कहर म्हणजे सत्ताधारी संचालक मंडळांनी या सभेमध्ये आपल्या स्वतःची इमारत असताना दुसऱ्या रिकाम्या जागेवर बांधकाम करण्याचा ठराव विषयी सूचित त्यांनी ठेवलेला होता व पतसंस्था स्वबळावर असताना अद्याप पर्यंत पतसंस्थेने कुठल्याही बँकेकडून कर्ज घेतलेले नाही.परंतु या सत्ताधारी संचालक मंडळांनी दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेण्यासाठी व वाढीव व्याजदराने कर्ज पुरवठा करण्यासाठी ठराव ठेवलेला होता. यामुळे जिल्ह्यातील सर्व सभासदांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. यासाठी पतसंस्था बचाव संघर्ष समितीने या विरोधात यापूर्वी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन केलेले आहे व सहकार विभागाकडे या ठरावा संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत. भ्रष्ट्र व नियमबाह्य पद्धतीने काम करणारे संचालक मंडळ बरखास्त करावे ही मागणी केली
addComments
टिप्पणी पोस्ट करा