5 फेब्रुवारीला संसदेवर मोर्चा!
नवी दिल्ली (दिनांक 9 जानेवारी): केंद्र आणि राज्य सरकारच्या शिक्षक व शिक्षण विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी देशातील सात मोठ्या संघटनांनी एकत्र येत अखिल भारतीय शिक्षक संघटना संयुक्त कृती समितीची(AIJACTO) स्थापना केली आहे. समिती शिक्षण व शिक्षकांच्या ज्वलंत प्रश्नावर देशव्यापी आंदोलन करणार असून 5 फेब्रुवारी रोजी संसदेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, देशातील शिक्षण विभाग प्रश्नग्रस्त बनला असून केंद्र आणि राज्य सरकारकडून देश उभारणीच्या महत्वाच्या या क्षेत्राकडे कमालीचे दुर्लक्ष आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक, विद्यापीठीय शिक्षकांच्या देशातील सात बलाढ्य संघटनांनी एकत्र येऊन एकीची वज्रमूठ आवळली आहे.अखिल भारतीय शिक्षक संघटना संयुक्त कृती समितीची (एआयजेसीटीओ) ने कृती कार्यक्रम घोषित केला असून खालील मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. मागण्या:
* RTE कायद्यापूर्वी नियुक्त झालेल्या सेवेत असलेल्या शिक्षकांना सक्तीच्या TET मधून सूट देण्यात यावी किंवा त्यांच्या सेवा, पदोन्नती व उपजीविकेचे संरक्षण करण्यासाठी कायमस्वरूपी सवलत/दुरुस्ती करण्यात यावी. आवश्यक असल्यास RTE कायद्यात दुरुस्ती करून TET फक्त नव्या नियुक्त्यांनाच लागू करावा.
* जुनी पेन्शन योजना (OPS) पुनर्स्थापित करा: NPS व UPS रद्द करून सर्व शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी.
* सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला हानी पोहोचवणाऱ्या NEP 2020 मधील सर्व तरतुदी त्वरित मागे घ्याव्यात.
* शाळांचे विलीनीकरण व बंद प्रक्रिया थांबवावी; सर्व रिक्त पदे तात्काळ भरावीत.
* शिक्षकांवरील अशैक्षणिक (non-teaching) कामाचा भार कमी करून त्यांना केवळ अध्यापन कार्यापुरते मर्यादित ठेवावे.
* शिक्षण क्षेत्रातील तात्पुरत्या/कराराधीन कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण करून सर्व सामाजिक सुरक्षा सुविधा द्याव्यात.
* “समान कामासाठी समान वेतन” या तत्त्वानुसार किमान वेतनाची अंमलबजावणी करावी.
* 8व्या केंद्रीय वेतन आयोगाची (8th CPC) वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित करावी. अखिल भारतीय शिक्षक संघटना संयुक्त कृती समिती 5 फेब्रुवारी रोजी संसदेवर मोर्चा काढणार असून मोर्चात प्रचंड संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक पी. एस. घाडगे, व्ही.जी.पवार, अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम,कोषाध्यक्ष औताडे ए. बी. उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे, सहसचिव रेखा सोळुंके, जिल्हाध्यक्ष व्ही. आर. चिलवरवार, सचिव आर के वाकोडे, ई डी पाटोदेकर, जी पी कौशल्य, आनंद मोरे, आर पी वाघमारे, डी बी नाईक, विजयालक्ष्मी स्वामी, बालाजी टिमकीकर, रावसाहेब पाटील, राजेश कदम, अब्दुल हसीब, आनंद सुरसे, बाबासाहेब घाटे,आतनूरकर, गंगाधर तेलंग, अरविंद काळे, मंगेश चाभरेकर यांच्यासह जिल्हा व तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

.jpeg)
addComments
टिप्पणी पोस्ट करा