गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना





    राम दातीर 

 माहूर (प्रतिनीधी )तालुक्यातील पाचोन्दा येथे आज दुपारी दुहेरी हत्याकांड घडल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ माजली आहे. 

   स्वतःच्या शेतात कापूस वेचणीचे काम करत असताना अंतकलाबाई अशोक अडागळे(60 वर्षे ) व अनुसयाबाई साहेबराव अडागळे (45 वर्षे )आपापल्या शेतात कापूस वेचत होत्या, त्यावेळी अज्ञात इसमाने त्यांचा गळा दाबून निर्घृण खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेला लूटमारीचा संशयही व्यक्त केला जात आहे.घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. 

टिप्पण्या