नवी मुंबई सानपाडा येथील कै. सिताराम मास्तर उद्यानात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व हरियाली संस्थेचे अध्यक्ष मारुती नाना कदम यांच्या पुढाकाराने ३०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. " झाडे लावा झाडे जगवा " हा मंत्र घेऊन सानपाड्यातील गार्डन ग्रुपचे सदस्य वृक्षारोपणामध्ये आर्थिक सहाय्य करून पुढाकार घेत आहे. ही एक आनंदाची बाब आहे. वृक्षारोपण प्रसंगी सानपाडा मधील नगरसेवक सोमनाथ वास्कर , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख अजय पवार, शाखाप्रमुख दत्तात्रय कुरळे, पोर्ट् ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, ज्येष्ठ नागरिक संघाचे खजिनदार विष्णुदास मुखेकर, समाजसेवक रणवीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते
जेष्ठ नागरिक संघातर्फे वृक्षारोपण*
addComments
टिप्पणी पोस्ट करा