यशवंत ' मधील रोहिणी सुधाकर चव्हाण यांना प्राणीशास्त्रात पीएच.डी.*


नांदेड :(दि.२३ जानेवारी २०२६) 

               श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र संशोधन केंद्रातील संशोधक रोहिणी सुधाकर चव्हाण यांना 'टॉक्सीकॉलॉजिकल इफेक्ट ऑफ झिंक अँड लीड ऑन बायलॉजिकल अँड बायोकेमिकल पॅरामीटर्स ऑफ फिश ओरिओक्रोमीस मोझॅमबिकस (पीटर्स १८५२)'या विषयावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांची पीएच.डी. पदवी प्राप्त झाली आहे. डॉ. नीताराणी जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधनकार्य पूर्ण केले.

               या संशोधनाच्या अनुषंगाने त्यांचे नऊ संशोधन लेख विविध जर्नल्समध्ये प्रकाशित झाले असून त्यांनी ९१ परिषदांमध्ये,कार्यशाळांमध्ये सहभाग नोंदविला आहे. या उल्लेखनीय शैक्षणिक योगदानाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

               स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी संशोधक रोहिणी सुधाकर चव्हाण व मार्गदर्शक डॉ. नीताराणी जयस्वाल यांचा सत्कार करून भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

               या सुयशाबद्दल उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ.संजय नंनवरे, डॉ.पद्माराणी राव, डॉ.साहेब शिंदे, प्रा.सुशील महिंद्रकर, डॉ. एच. एल. तमलूरकर, डॉ. मंगल कदम, डॉ. धनराज भुरे, डॉ. बी. बालाजीराव, प्रा. साहेब माने, प्रा. नारायण गव्हाणे, डॉ. दीप्ती तोटावार, डॉ. अजय गव्हाणे,डॉ. शिवराज बोकडे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या