मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे आ. बालाजी कल्याणकर व मंगेश कदम यांनी केले स्वागत


 


नांदेड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे नांदेड विमानतळावर आले असता  उत्तर मतदार संघांचे आमदार बालाजीराव कल्याणकर व शिवसेना एस. सी. एस. टी. ओबीसी विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

हिंगोली येथील रामलीला मैदानावर आयोजित “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे रविवारी नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळावर दुपारी 2.15 वाजता आगमन झाले. हिंगोली येथील कार्यक्रमासाठी नांदेड येथे ते विशेष विमानाने आल्यानंतर विमानतळ येथे नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर व शिवसेना एस. सी. एस. टी. ओबीसी विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी मंगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली एस. सी. एस. टी. ओबीसी विभागाच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत होत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना दिली. याप्रसंगी विमानतळावर शिवसेना -भाजप पक्षाचे नेतेमंडळी  व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज