नांदेड- येथून जवळच असलेल्या नवी वाडी उपनगरातील संत शिरोमणी श्री रविदास महाराज सांस्कृतीक सभागृहाच्या भुमीपुजन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते काल झाले. आमदार बालाजीराव कल्याणकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भाजपा महानगर उपाध्यक्ष नांदेड तथा ग्रामपंचायत सदस्य वाडी प्रतापराव पावडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संत रोहिदास यांनी महान कार्य केल्यामुळे सुधारक संतांमध्ये त्यांचे स्थान आहे. ते तत्कालीन प्रचलित सामाजिक विद्वान होते. त्यांनी समाज सुधारणेत लक्षणीय असे योगदान आहे,त्यांच्या विचाराची आज गरज असल्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले. महान संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांच्या नावाने बांधण्यात येत असलेल्या सांस्कृतीक सभागृहाला निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी अभिवचन दिले. भाजपा महानगर उपाध्यक्ष प्रतापराव पावडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मिलिंद देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे,पि.टी. जमदाडे,ना. तु. खांदारे,बालाजी सोनटक्के,व्यंकटराव दुधंबे,बालाजी दुधंबे,माधवराव गायकवाड,शिवानंद जोगदंड,तुकाराम टोम्पे,अस्तिक कोरडे,अॅड. राम जोगदंड,प्रा.डॉ. अनंत राऊत,विजय इंगळे,इंजि. रावसाहेब गंधारे,पद्माकर बाबरे,गोविंद माऊली पार्डीकर,नरसिंग सुर्यवंशी,संदिप गोरे,चंद्रप्रकाश सांगवीकर,गोविंद वाघमारे,विठ्ठल वाघमारे,गंगाधधर लष्करे,ऍड दळवी,सौ. वर्णा बुक्तरे (सरपंच, वाडी),बंडुभाऊ पावडे,माधवराव पावडे,हरिभाऊ पावडे,रमेशराव पावडे,बाळासाहेब पावडे,बंडु पावडे,रमेश लोखांडे,राम पावडे,सुभाष कुरवडे,प्रविण केंद्रे,शशिकांत अकुलवार,गुणाजी बादवड,अनिल हनवंते,निखील गर्ने,नितीन सावते,विठ्ठल पावडे,विलास पावडे हे उपस्थित होते.

addComments
टिप्पणी पोस्ट करा