मुस्तफा पटेल यांच्याकडून कुंचेली जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत फिल्टर पाणपोई सुरू

नायगाव प्रतिनिधी : सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मुस्तफा पटेल कुंचेलीकर यांनी स्वताच्या जन्मदिनानिमित्त इतरत्र अनावश्यक खर्च टाळून एक समाज उपयोगी कार्यक्रमाचा निर्माण घेऊन कुंचेली येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत फिल्टर पाणपोई सुरुवात करण्यात केली असून गावातील प्रत्येक नागरिकांनी पटेल यांच्या सारखा समाज उपयोगी उपक्रम राबविले तर जिल्हा परिषद शाळेला नववैभव येण्यासाठी वेळ लागणार नाही असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रावण पाटील भिलवंडे यांनी केले.

        याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती श्रावणी पाटील भिलवडे हे होते तर उद्घाटक म्हणून रामतीर्थ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीधर जगताप होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी चित्तावार, राजेंद्र पा. होनराव, पत्रकार शेषेराव कंधारे, भास्कर भेदेकर, तानाजी शेळगावकर, बालाजी गंगासागरे, उपसरपंच उध्दव बोयाळ, पो.पा. राजकुमार होनराव, शालेय समितीचे अध्यक्ष मालोजी जोगदंड, गुंडाजी बोयाळ यांसह आदींची उपस्थिती होती. सध्या उन्हाचा पारा वरचेवर वाढत आहे त्यामुळे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा पटेल यांनी स्वताच्या जन्मदिनानिमित्त इतरत्र बॅनर बाजी व इतरत्र अनाठायी खर्च टाळून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागे पर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत फिल्टर पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे त्यामुळे त्यांच्या या सामाजिक उपक्रमांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यावेळी सहशिक्षक पंडीत जांभळे, बाबुराव जांभळे, सदाशिव शिवशेडे, गायकवाड सह आदीं शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव शिवशेट्टे यांनी केले तर आभार प्रदर्शन गायकवाड सर यांनी मानले.
टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज