चांगली सकारात्मक भावना ठेवून फक्त कोणाचे चांगले करायचे फक्त इच्छा ठेवल्यास आपोआपच चांगले होऊन जाते* तुझ्या आई बाबांनी सांगितले तर मी तुझ्या बायकोला माहेर हून मी घेऊन येतो.
ही गोष्ट वीस पंचवीस वर्षे अगोदरची माझ्या एका बौद्ध समाजाच्या मित्राच्या मुलाची आहे.... माझ्या मित्राची सुन आपसातील काही मतभेदा मुळे घर सोडून आपल्या माहेरी निघून गेली होती. एके दिवशी मित्राचा मुलगा माझ्या दुकानात येऊन मला विनंती करू लागला माझी बायको भांडणं करून घरून माहेरी निघून गेली व खुप दिवस झाले येण्यास तयार नाही काका आपण काही करू शकता का?*. *माझे ह्या परिवाराचे फार घनिष्ठ संबंध होते व आज पर्यंत ही टिकून आहेत.मी मित्राच्या मुलाला सांगितलो जर मला तुझे आई बाबा येऊन सांगितले तर मी जाऊन तुझ्या बायकोला माहेर हून घेऊन येतो.*. *माझ्या कडून असे ऐकल्या बरोबर तो आनंदाने पळत जाऊन माझ्या मित्राला जाऊन मला सांगण्यासाठी पाठवून दिला. कोणतेही आई वडील हे आपल्या मुलाचा संसार चांगला होण्यासाठी काही ही करायला तयार असतात. ते बिचारे ताबडतोब माझ्या कडे पळत आले व मला विचारणा केली तुम्ही आमच्या मुलाला असे सांगितले का? माझा होकारार्थी उत्तर ऐकून त्यांनी मला एक प्रश्न विचारला तुम्हाला हे शक्य कसे होणार तसे त्यांना माहीत होते की त्यांच्या व्याही ची व माझी चांगली ओळख आहे.
परंतु त्यांचा एक प्रश्न होता आम्ही आमच्या समाजातील सर्व स्तरातील लोकांकडून सांगुन सांगुन थकलो आहे. व आपल्या माहितीसाठी आम्ही आमच्या समाजाच्या मोठ मोठ्या नेत्यांच्या कडून आमच्या व्याहीला समजावले व मुलीला पाठविण्याबाबत सांगितले परंतु काही उपयोग झाला नाही!*. *त्यांनी दिलेल्या या माहिती मुळे मी मनातल्या मनात थोड गोंधळून व घाबरून गेलो की जे काम त्यांच्या समाजातील प्रतिष्ठित व नेते मंडळीना जमले नाही ते मी कसे करणार. दुसरी भिती म्हणजे जर मी सांगायला गेलो व त्यांच्या व्याहीने मी भिती दाखवली म्हणून तक्रार केली अथवा ॲट्रासीटी चा गुन्हा दाखल केला तर मी अडचणीत येण्याची शक्यता आहे असे वाटल्याने मी तुर्तास वेळ पुढे ढकलण्यासाठी मी तुमच्या सुनेला घेवुन येतो परंतु या साठी तीस दिवसांचा वेळ लागेल म्हणून तुर्तास थोडे मागे वळून गेलो.*. *तशी माझी मनापासून इच्छा होती की यांच्या संसाराचे बरे झाले पाहिजे.मी रोज विचार करत होतो की याचा उपाय कसा शोधू शकेल. परंतु काही मार्ग निघत नव्हता...पाहत पाहत पंचवीस दिवस लोटले व पंचवीसव्या दिवसी माझे मित्र व त्याची बायको दुकाना समोर ॲटो थांबवून दुकानात प्रवेश करू लागले. त्यांना पाहताच माझ्या मनात आता ह्यांना काय उत्तर द्यावे हेच सुचत नव्हते.*. *परंतु एक आश्चर्य झाले त्यांच्या हातात एक मिठाईचा डब्बा होता व ते दोन्ही नवरा बायको माझे पाया पडून तुमच्या मुळे आमची सुन आमच्या घरी आली म्हणून धन्यवाद देत होते. मी थोडा गोंधळून गेलो व मी स्वतःला सावरुन मिठाई खाण्याच्या अगोदर स्पष्ट शब्दात त्यांना सांगितलो मी तर काही ही केलेलं नाही कारण मला खोट बोलण्याची सवय नहीं मग कीती ही नुकसान झाले तरी मला चालते.*. *त्यांचे म्हणणे होते आम्हाला माहीत आहे तुम्ही काही केलेलं नाही परंतु तुम्ही आम्हाला तीस दिवसांचा वेळ दिला होता त्याला अजून पाच दिवस बाकी आहेत. आम्ही आमच्या मनावर कंट्रोल करू शकत नव्हते की पांच दिवसाची आणखी वाट कशी बघायची म्हणून आम्ही दोघे फार उतावीळ होऊन थेट आमच्या व्याहीच्या घरी पोहचलो त्या वेळी घरात आमच्या सुनेच्या व्यतिरिक्त तेथे कोणीही नव्हते आम्हाला पाहिल्या पाहिल्या आमची सुन खुप खुश होऊन मामा चला आपल्या घरी जाऊत म्हणु लागली. आम्ही तिला समजावण्याचा प्रयत्न करत होतो तुझे आई बाबा येऊ दे त्यांना सांगुन मग जाऊ परंतु ती आमचे न ऐकता तुम्ही माझ्या आई बाबांना आल्या नंतर बोलत बसा मी माझ्या घरी जाते म्हणून सरळ एकटी पळत आमच्या घरी आली. नंतर आमचे व्याही येई पर्यंत आम्ही थांबलो व त्यांना सुन आमच्या घरी गेल्याची कल्पना दिली.ते ही फार खुश झाले. माझ्या मित्राने सांगितले हे फक्त तुमच्या सकारात्मक व चांगल्या भावनेचं फळ आहे माझ्या मुलाचा संसार मार्गी लागला. म्हणून आम्ही मिठाई सोबत खुश खबर देण्यासाठी आलो धन्यवाद*. *या नंतर माझ्या मित्राची सुन मुलगा व त्यांच्या व्याहीने ही येऊन माझे आभार मानले. आज ज्यांचा संसार फक्त सकारात्मक विचार व चांगल्या भावनेने जुळला गेला त्यांची एक मुलगी इंजिनिअर व दुसरी पदवीधर झाली.एका मुलीचे लग्न ही झाले.*. . *या कार्यात मी काही ही केले नव्हते फक्त कोणाचे चांगले व्हावे हाच माझा दृष्टिकोन होता व याला देवाने पण साथ दिली.*.
- राजेंद्र सिंघ नौनिहाल सिंघ शाहू
- इलेक्ट्रिकल ट्रैनंर 7700063999
- संचालक स्वंय रोजगार मार्गदर्शन शिबिर व इलेक्ट्रिकल ट्रेनिंग कोर्स नांदेड*
addComments
टिप्पणी पोस्ट करा