एसपींच्या ऑपरेशन मुस्कान मुळे अनेक परिवाराच्या चेहऱ्यावर मुस्कान



प्रतिनिधी - महेंद्र पुरी, हिंगोली 

हिंगोली जिल्ह्यात पहिल्यांदाच हरवलेल्या व मिसींग नागरिकांच्या शोधासाठी पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन मुस्कान अभियान राबविण्यात आले. पोलिस अधीक्षक यांच्या अभियानामुळे अनेक परिवाराच्या चेहऱ्यावर मुस्कान फुलल्याचे दिसुन आले. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत हिंगोली पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करीत मिसींग मधील 49 ईसमांना शोधन्यात यश आले आहे. हिंगोली जिल्ह्यात प्रलंबित मिसींग, हरवलेले ईसम व बालक यांचे नऊ दिवस विशेष शोध मोहिम ऑपरेशन मुस्कान राबविण्यात आले. सदर मोहिम सर्व 13 पोलिस स्टेशन स्तरावर व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने राबविण्यात आली. यामध्ये विशेष पथक स्थापन करून या मोहिमेत हिंगोली पोलिसांनी कामगीरी करून हरवलेले मिसिंग मधील एकूण 29 पुरूष व 20 महिलांचा शोध घेऊन त्यांच्या परिवाराच्या स्वाधीन केले.तर याच मोहिमेत कलम 363 मधील एका अल्पवयीन मुलाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या या मोहिमेचे जिल्हा भरात कौतुक केले जात आहे. तर मिसींग व्यक्तीनां शोधून परिवाराच्या स्वाधीन केल्याने परिवाराच्या चेहऱ्यावर मुस्कान फुलल्याचे दिसुन आले.

टिप्पण्या