मुंबई पोर्ट ट्रस्टमधील भंडार भवन येथे २४ मार्च २०२२ रोजी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत मा.आमदार मंगेश कुडाळकर, ज्येष्ठ कामगार नेते ऍड. एस. के. शेट्ये, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, मुंबई पोर्ट ट्रस्ट स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला.
कार्यक्रमास मुंबई पोर्ट ट्रस्टचे वरिष्ठ उपसचिव शेनॉय, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या भंडार व्यस्थापक अंजली हजरनिस, मुंबई पोर्ट ट्रस्ट स्थानिय लोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष संजय माधव, सरचिटणीस सूर्यकांत शिंदे, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी दत्ता खेसे, प्रसिद्धिप्रमुख मारुती विश्वासराव, खजिनदार विकास नलावडे,संघटक चिटणीस मनीष पाटील, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनच्या खजिनदार कल्पना देसाई, सेक्रेटरी विनोद पितळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्तम आयोजन मुंबई पोर्ट ट्रस्ट स्थानिय लोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष नंदू राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे संघटक चिटणीस संदीप चेरफळे यांनी केले. पाहुण्यांचा व मान्यवरांचा तुळशी वृंदावनचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.याप्रसंगी शिवव्याख्याते मंगेश सावंत व त्यांचे सहकारी संतोष सकपाळ,निवेदिता मेकडे, समृधा खंडेवाल यांनी छत्रपती शिवरायांवर स्फूर्ती गीतांचा उत्कृष्ट कार्यक्रम सादर केला. महाराष्ट्र शासन पुरस्कृत गुणवंत कामगार संजय तावडे यांचा सत्कार करण्यात आला.
आपला
मारुती विश्वासराव

COMMENTS