*मुंबई दि.३०: गेल्या दोन वर्षापासून बंद असलेल्या देशातील एनटीसीच्या २३ गिरण्या केंद्र सरकारने पूर्ववत चालू करून कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांची उपासमार त्वरित संपुष्टात आणावी,अन्यथा कामगार रस्त्यावर येतील, असा इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजीराज्यमंत्री सचिन अहिर यांनी येथे कामगारांच्या निदर्शन आंदोलनात बोलताना आज दिला.*
केंद्र सरकारच्या कामगारहित विरूद्ध धोरणाचा निषेध करण्यासाठी केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने देशपातळीवर २८ व २९ रोजी भारत बंदची हाक देण्यात आली होती.त्याला सक्रिय पांठिंबा देण्यासाठी कामगार संघटना संयुक्त कृती समिती-महाराष्ट्र,महाराष्ट्र इंटक,राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने लालबाग भारतमाता सिनेमा समोर आज कामगारांची तीव्र निदर्शने पार पडली.
त्या वेळी कामगारांच्या निदर्श नात बोलतांना सचिन अहिर पुढे म्हणाले, देशपातळीवर माझ्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या राष्ट्रीय समन्वय कृती समितीच्या वतीने दिल्लीत जंतरमंतरवर निदर्शने करण्यात आली. खासदार आणि विविध कामगार संघटनांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने वस्त्रोद्योगमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली .पण सरकारच्या हृदयाला पाझर फुटलेले नाही. महागाईवाढ गगनाला भिडूनही पेट्रोल,डिझेल आणि स्वयंपाकाच्या गँससिल़ीडरच्या किंमती आटोक्यात आणण्यात केंद्र सरकार अपयेशी ठरले आहे,असे सांगून श्री.अहीर म्हणाले,परदेशी गुंतवणूकदार आणि मालिकशाहीला तारक पण कामगारांना मारक ठरलेले "फोर बील"सरकारने मागे घेतले पाहि जे.सार्वजनिक उद्योग खाजगी मालकांना न देता सरकारने चालविले पाहिजेत,ज्या मुळे रोजगार सुरक्षित राहील,असेही सचिन अहिर आपल्या भाषणात म्हणाले.
सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणाचा, महाराष्ट्र कृती समितीचे नेते विश्वास उटगी यांनी खरपूस समाचार घेतला.सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात पदाधिकारी सर्वश्री
निवृत्ती देसाई,आण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण,सुनिल अहिर,साई निकम तसेच
माजी नगरसेविका रत्ना महाले, मिलिंद तांबडे,शिवाजी काळे इत्यादींची भाषणे झाली.आंदोनाला भारतीय कामगार सेनेने पाठिंबा दिला होता.●●

COMMENTS