प्रयत्न केले तर मायमराठी खरीखुरी राजभाषा बनू शकते - संमेलनाध्यक्ष डॉ. सुरेश सावंत 11 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचा उदघाटन सोहळा उ...
प्रयत्न केले तर मायमराठी खरीखुरी राजभाषा बनू शकते - संमेलनाध्यक्ष डॉ. सुरेश सावंत
11 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचा उदघाटन सोहळा उत्साहात
(स्व. अजितदादा पवार साहित्यनगरी)
पळसप, दि.29 -
ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या माध्यमातून शिक्षक आमदार विक्रम काळे सातत्याने करत आहेत. स्व. वसंतराव काळे यांच्या विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने ते चालवीत आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप आणि राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 11 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे उदघाटन रविवारी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष तथा सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.सुरेश सावंत, माजी मंत्री आ.संजय बनसोडे, मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ.म. शहाजिंदे, स्वागताध्यक्ष आ.विक्रम काळे, प्राचार्य अनिल काळे, सौ.अनुराधा काळे, सौ. शुभांगी काळे, व्यंकट बेद्रे, कुलगुरू मधुकरराव गायकवाड, अंकुश नाडे, प्राचार्य हरिदास फेरे, बालाजी तांबे, गंगाधर आरडले, बाबासाहेब भिसे, राजकुमार मेंढेकर, राजकुमार जाधव,, आनंद जाधव, बंटी मयिंग, युवराज शिंदे, डी. एन. केंद्रे विपुल काळे, रणवीर काळे, प्राचार्य तथा संस्थापकीय सहसचिव श्री प्रा. सुदर्शनरावजी धर्माधिकारी साहेब. प्रा. महेश आनंदराव देशमुख जिल्हा उपाध्यक्ष जुक्ठा संघटना नांदेड तथा विभागीय कोषाध्यक्ष लातूर तसेच लातूर जिल्ह्यातील अनेक संस्थापकीय अध्यक्ष मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी शिक्षणमहर्षी स्व.वसंतराव काळे व स्व. अजित दादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करण्यात आले.
चंद्रकांत बिराजदार, हेमंत जाधव, दत्तात्रय पवार, रमेश बिराजदार, बी. एन. केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी शिक्षणमहर्षी स्व.वसंतराव काळे व स्व. अजित दादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करण्यात आले.
पुढे बोलताना मंत्री पाटील म्हणाले, मराठी साहित्याला मोठी परंपरा आहे. संत साहित्याचा वारसा जपण्याचे कार्य मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दरवर्षी होत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. भालचंद्र नेमाडे, शरणकुमार लिंबाळे, ना. धों. महानोर यांच्या सारख्या लेखकांनी मराठी साहित्याला उंची दिली. मराठी भाषेतील अभंग, भारुड या कला प्रकारांनी समाज जागृतीचे काम केले. हाच मराठी साहित्याचा जागर या संमेलनात होत असल्याचेही ते म्हणाले.
माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी, स्व. आमदार वसंतराव काळे यांनी जीवन मूल्यांची शिकवण दिली असल्याचे सांगून मराठवाड्यात त्यांनी विचारांचे जाळे निर्माण केले. शिक्षक आमदार असताना त्यांनी विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न त्यांनी सतत मांडले, असेही ते म्हणाले.
स्वागताध्यक्ष आ. विक्रम काळे यांनी, संमेलन आयोजनामागील उद्देश स्पष्ट करून ग्रामीण मराठी साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी केले.
अध्यक्षीय भाषणात, संमेलनाध्यक्ष डॉ. सुरेश सावंत म्हणाले की, बॅरिस्टर सावरकर यांनी 1938 साली साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून मातृभाषा हीच ज्ञान भाषा झाली पाहिजे असा आग्रह धरला होता. तरीसुद्धा अजुन त्यांचे स्वप्न साकार झाले नाही. मायमराठीची उपेक्षा आणि दुरवस्था अजुन थांबलेली नाही. आम्ही कोणत्याही भाषेचे विरोधक नाहीत किंवा कोणत्याही एका भाषेसाठी दुराग्रही नाही. पण मराठीची अवहेलना होऊ नये, असे मनापासून वाटते. प्रयत्न केले तर आपली मायमराठी फक्त नावापुरती नव्हे तर खरीखुरी राजभाषा बनू शकते, असेही त्यांनी सांगितले.
उद्घाटन सत्राचे सुत्रसंचालन किरण कोरे यांनी तर आभारप्रदर्शन बालाजी इतबारे यांनी केले. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. सुरेश सावंत लिखित अनुभवाचे बोल या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास मराठवाड्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह साहित्यिक, कवी, साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रंथदिंडीने दुमदुमली साहित्यनगरी
साहित्य संमेलनात सकाळी गावातून भव्यदिव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथ दिंडीचे उदघाटन बार्शीच्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष जयकुमार शितोळे यांच्या हस्ते झाले. ग्रंथदिंडीत धाराशिव, लातूर जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी लेझीम, ढोल-ताशाच्या निनादात सहभाग घेतला. पौराणिक, ऐतिहासिक आणि विविध महापुरुषांच्या वेशभुषेतील चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ग्रंथदिंडीतील विद्यार्थ्यांच्या उत्स्फुर्ततेले शिक्षणमहर्षि वसंतराव काळे साहित्यनगरी दुमदुमून गेली होती.
ग्रंथप्रदर्शनाला साहित्यरसिकांचा भरभरून प्रतिसाद
साहित्य संमेलनात दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनाचे उदघाटन मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.घ.ना. पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनाला साहित्यप्रेमींचा भरभरून प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच ग्रंथ प्रदर्शनस्थळी साहित्य रसिकांची झुंबड उडाली होती. आपल्या आवडत्या लेखकांची पुस्तकं शोधणार्या नजरा ग्रंथप्रदर्शनात दिवसभर दिसून आल्या.
चित्रप्रदर्शनात रसिकांची पावले थबकली
साहित्य संमेलनात सुप्रसिद्ध चित्रकार शिवाजी हांडे यांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. याचे उदघाटन सुप्रसिद्ध साहित्यिक राजेंद्र अत्रे (धाराशिव) यांच्या हस्ते करण्यात आले. विविध सामाजिक विषयांसह आशयघन चित्रे पाहून साहित्यरसिकांची पावले इथेही थबकत होती. चित्रकार श्री. हांडे त्या-त्या चित्रांमागील आशय रसिकांना समजावून सांगत होते.ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाने केले -सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

COMMENTS