परभणी (क्रीडा प्रतिनिधी) गांधीधाम गुजरात येथे पार पडलेल्या 87 व्या आंतर राज्य जुनियर राष्ट्रीय अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या दहा वर्षीय आद्या पूजा महेश बाहेती या खेळाडूने ऐतिहासिक कामगिरी करत चार पदकं प्राप्त केले. 14 वर्षे मुलींच्या सांघिक गटात रौप्य, 13 वर्ष एकेरी मुलींच्या गटात रौप्य पदक,11 वर्ष एकेरी मुलींच्या गटात कांस्य पदक तसेच तेरा वर्ष मिश्र दुहेरीत गटात कांस्य पदकासोबत पूर्ण स्पर्धेत 2 रौप्य व दोन कांस्य असे एकूण चार पदके मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. महाराष्ट्राचे व परभणी जिल्ह्याचे नाव उज्वल केले.
या स्पर्धेत तिने एकूण सहा गटांत सहभाग नोंदवला होता त्यातील चार गटात तिला पदकं पटकावत राज्य संघटने तिच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत उल्लेखनीय कामगिरी केली.
आद्या ही भारतीय खेळ प्राधिकरण व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,परभणी यांच्या अंतर्गत खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रात टेबल टेनिस प्रशिक्षक श्री चेतन मुक्तावार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेते.
टेबल टेनिसच्या सरावासाठी तिला वेळोवेळी अनिल बंदेल, सचिन पुरी,असद अली, अजय कांबळे, ईश्वर कदम यांचे मार्गदर्शन लाभते. तसेच ऐश्वर्या पाटील (फिजिओ) व कांचन वसेकर (योग प्रशिक्षक) यांचेही सहकार्य मिळते. आद्या स्कॉटिश अकॅडमी या शाळेत इयत्ता पाचवीत शिकत आहे.
टेबल टेनिस राज्य संघास उज्वल यश प्राप्त झाले बद्दल
महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष प्रवीण लुकंड, राष्ट्रीय सरचिटणीस यतिन टिपणीस, जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, कल्याण पोले,क्रीडा अधिकारी मिलिंद साळवे,सुयश नाटकर, रोहन ओंढेकर, परभणी जिल्हा अध्यक्ष समशेर वरपुडकर, डॉ.माधव शेजुळ, प्रा. संतोष सावंत, जिल्हा सचिव व राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश माळवे, सह सचिव ज्ञानेश्वर पंडित परभणी सिटी क्लबचे सचिव डॉ. विवेक नावंदर, सह प्रशिक्षक विक्रम हातेकर, पवन कदम, पीयूष रामावत, तुषार जाधव, सूरज भुजबळ, रोहित जोशी, साक्षी देवकाते,भक्ती मुक्तावार तसेच पालकांनी अभिनंदन केले.

COMMENTS