नांदेड: राज्यात उन्हाचा कडाका वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आ...
नांदेड:
राज्यात उन्हाचा कडाका वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला असून, आता या शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश शिक्षण विभागाने निर्गमित केले आहेत.
महत्त्वाचे बदल आणि नवीन वेळापत्रक:
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने (प्राथमिक व माध्यमिक) जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, हा बदल ०६ मार्च २०२६ पासून लागू होणार आहे. नवीन वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल:
• शाळेची वेळ: सकाळी ८:३० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत.
• मध्यंतराची (सुट्टीची) वेळ: सकाळी ११:०० ते ११:३० (३० मिनिटे).
• लागू असलेल्या शाळा: सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळा (CBSE शाळा वगळून).
आरोग्याची काळजी आणि नियमांचे पालन:
वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक समस्या उद्भवू नयेत, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, जरी वेळेत बदल झाला असला, तरी RTE (शिक्षण हक्क अधिनियम २००९) नुसार विहित केलेल्या अध्यापनाच्या तासांमध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही.
ज्या शाळा दोन सत्रात भरतात, त्यांच्या मुख्याध्यापकांनी कामकाजाचे तास पूर्ण होतील अशा पद्धतीने नियोजन करून त्याचे वेळापत्रक गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

COMMENTS