वंचित आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

  नांदेड. (विशेष प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण तालुक्याच्या वतीने ३० मार्च रोजी नांदेडच्या 'एमआयडीसी' परिसरातील एका मंग...

 


नांदेड. (विशेष प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण तालुक्याच्या वतीने ३० मार्च रोजी नांदेडच्या 'एमआयडीसी' परिसरातील एका मंगल कार्यालयात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला असून, या मेळाव्यास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे. 


नवीन नांदेड भागातील बळीरामपुर परिसरातील मंगल कार्यालयात

बुधवारी पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे प्रवक्ते फारूख अहमद यांची उपस्थिती होती. प्रारंभी, बुलढाणा येथील जिल्हा परिषदेचे सदस्य राजाभाऊ भोजने यांच्या हस्ते महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मेळाव्याचे थाटात उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी विचार मंचावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, मुदखेड पं. स. सदस्य बालाजी सुर्यतळे, महानगराध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष रवी पंडीत, वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाअध्यक्षा दैवशाला पांचाळ व वंचित बहुजन आघाडी मराठवाडा सदस्य डॉ. संघरत्न कुऱ्हे यांची उपस्थिती होती. 

दरम्यान, राज्य प्रवक्ता फारूख अहमद, जि. प. सदस्य राजाभाऊ भोजने, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, नांदेडचे महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष रवी पंडीत, मुदखेड पं.स. सभापती बालाजी सुर्यतळे व डॉ. संघरत्न कुऱ्हे यांनी मेळाव्याला उपस्थित कार्यकर्त्यांना पक्षाच्या ध्येय-धोरणाविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक मेळाव्याचे आयोजक तथा नांदेड दक्षिण तालुकाध्यक्ष विनायक गजभारे यांनी केले. सूत्रसंचालन धम्मानंद एंगडे आणि अनिल वाघमारे यांनी, तर रवी पंडीत यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता सुदर्शन कांचनगिरे, मारोती डोईबळे, अनिल वाघमारे, शेख बशीर, सयद ताहेर, ऍड. वैभव लष्करे, डॉ. सिध्दार्थ भेदे, अमोल शिरसे, संदेश भालेराव, विकास धोतरे व श्याम नायेगावे यांच्यासह त्यांच्या सर्व सहकारी पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group