केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणामुळे देशातील कामगार संघटनांनी गेली १५० वर्षे संघर्ष करून मिळविलेले ४४ कामगार कायदे नष्ट करून ४ लेबर कोड आणले आहेत. यामुळे देशातील कामगार व कामगार चळवळ उध्वस्त होणार असून कायम नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या या मालकधार्जिण्या धोरणाविरुद्ध केंद्रीय कामगार संघटनांनी २८ व २९ मार्च २०२२ रोजी भारत बंद पुकारला होता, त्याचाच एक भाग म्हणून आज हिंद मजदूर सभेच्या वतीने छत्रपती शिवाजी टर्मिनल प्लॅटफॉर्म क्रमांक १८ वरून मोर्चा काढला, हा मोर्चा घोषणा देत, त्याचे रूपांतर शेवटी आझाद मैदानावर सभेत झाले. या मोर्चात रेल्वे, पोर्ट,मुंबई महानगर पालिका, नुसी, सिटूचे कामगार, तसेच कामगार नेते वेणू नायर यांच्या नेतृत्वाखाली हजारो नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे कामगार मोर्चात सहभागी झाले होते.
आझाद मैदान येथे झालेल्या सभेत कामगार नेते शंकर साळवी, संजय वढावकर , सुधाकर अपराज, निवृत्ती धुमाळ, प्रदीप शिंदे, दिविदास महाले, अशोक जाधव, विद्याधर राणे, केरशी पारेख, कल्पना देसाई,शीला भगत, विकास गुप्ते, विवेक मोंटेरो आदी कामगार नेत्यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
आपला
मारुती विश्वासराव


COMMENTS