धर्माबाद (अहमद लड्डा)
जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्या आदेशानुसार धर्माबाद तालुक्यातील अतिवृष्टी नुकसानीची उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी प्रत्यक्षात शिवारात जाऊन पाहणी करून झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांकडून आज माहिती घेतली आहे. थेट उपजिल्हाधिकारी शेतात येऊन पाहणी करीत नुकसानीचे पंचनामे केल्याने शेतकऱ्यांतुन समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्याकडे धर्माबाद व उमरी तालुक्यातील नुकसानीची पाहणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती त्यानुसार त्यांनी आज तालुक्यातील तिन्ही मंडळातील गावामध्ये जाऊन प्रत्यक्षात शिवार पाहणी करीत शेतकऱ्यांना या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेत महसूल व कृषी विभागास आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
यावेळी त्यांच्या समवेत तहसीलदार दतात्रय शिंदे,मंडळ आधिकारी ,मंडळ कृषी अधिकारी, तलाठी, कृषी सहायक उपस्थित होते. तालुक्यातील महसूल विभागाच्या तिन्ही मंडळातील खरिपाच्या सोयाबीन, उडीद, मूग,कापुस पिक नुकसानीचीही पाहणी केली आहे.
नुकसानीबाबतीत ऑनलाइन व ऑफलाईन आशा दोन्ही तक्रारी केलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीची गंभीरपणे नोंद घेत पीकविमा कंपनीस नुकसानीचे पंचनामे करण्याबाबतीत जिल्हाप्रशासनाने आदेशीत केले असून पीकविमा कंपनीकडून जर पंचनामे होत नसतील तर शेतकऱ्यांनी तात्काळ तहसीलदार किंवा तलाठी यांना माहिती द्यावी असेही यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ सचिन खल्लाळ म्हणाले.तालुक्यातील अतिवृष्टी नुकसानीबाबतीत सर्व महसूल व कृषी विभागास आवश्यक त्या सूचनाही या दौ-यात उपजिल्हाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांनी दिल्या आहेत. स्वतः उपजिल्हाधिकारी शेतात येऊन पाहणी नुकसानीची पाहणी केली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

COMMENTS