धर्माबाद (प्रतिनिधी) येथील माहीती अधिकार कार्यकर्ते लक्ष्मण पाटील येताळे यांनी माहिती अधिकार कायद्याचा वापर करून अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणले...
धर्माबाद (प्रतिनिधी) येथील माहीती अधिकार कार्यकर्ते लक्ष्मण पाटील येताळे यांनी माहिती अधिकार कायद्याचा वापर करून अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणले आहे तर दितीय अपिल वर सुनावणी अंती काही शासकीय अधिकारी यांना आयोगाची शास्ती लागली. तालुक्याच्या अनेक शासकीय कार्यालयात माहिती अधिकार जनमाहीती अधिकारी चे फलक लावण्यास भाग पाडले.या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्यात भ्रष्टाचार प्रकरणी अनेक अधिकारी यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करणारे दताञय अनंतवार यांनी त्यांच्या माहिती अधिकार तपास समिती च्या धर्माबाद तालुका अध्यक्षपदी लक्ष्मण पाटील येताळे यांची निवड केली असून नियुक्तीचे पञ त्यांना श्री अनंतवार यांनी दिले आहे. धर्माबाद येथील राजकीय,सामाजिक पदाधिकाऱ्या सह अनेकांनी लक्ष्मण पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS