धर्माबाद (अहमद लड्डा) तालुक्यातील सीमेवर लढणाऱ्या जवानांचा गेल्या सहा-सात वर्षांपासून सिमेवर तैनात जवानांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळीच्या दिवसात अभिनव उपक्रमास सह विविध सामाजिक उपक्रम राबवणारे सैनिक कल्याण समितीचे अध्यक्ष शिवराज पाटील गाडीवान व सचिव शिवकुमार पाटील सर यांच्या विद्यमाने तालुक्यातील भारतीय सिमेवरील तैनात पण सध्या सुट्टिवर आलेल्या जवानांच्या घरी जाऊन दिपावळी व भाऊबीजेच्या दिवशी त्यांचा सन्मान करत कुटुंबीयांचा सन्मान सत्कार करत दीपावली साजरी केली जाते. नुकत्याच झालेल्या कारगिल दिन च्या औचित्याने धर्माबाद कल्याण समितीच्या वतीने धर्माबाद येथे सैन्यदलात सेवा बजावून आलेले सेवानिवृत्त जवान श्री विनोद देविदास उमरे व संजय दत्तराम पंदिलवाड यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान केला.
तर सुट्टीवर आलेल्या धर्माबाद तालुक्यातील भिमकिरण भगवानराव कदम, अनिल हणमलु गोणेवार व शिवराज गंगाधरराव बोमलवाड या सैन्य दलात कार्यरत जवानांचा ही सैनिक कल्याण समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला .
भारतीय सैन्य दलातील जवानांचे मनोबल वाढवणे व त्यांच्या प्रति समाजामध्ये आदर स्थापन व्हावा व आपल्या भारतीयसाठी लढणाऱ्या जवानांची ओळख तालुक्यातील सर्व नवतरुणांना व्हावी या प्रयोजनातुन स्थापन केलेल्या सैनिक कल्याण समितीत चे कार्य गेल्या सहा वर्षापासून तालुक्यातील नव युवकांना भारतीय सैन्यदलामध्ये प्रेरित करण्यासाठी मोठी मार्गदर्शन शिबिरे जिल्ह्यातील भारतीय सैन्य दलात कार्यरत होऊन सेवानिवृत्ती झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नव युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित करण्याचा मनोदय अध्यक्ष व सचिव यांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे बोलून दाखवला.

COMMENTS