कळमनुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगारावर Asp यांची कारवाई

हिंगोली जिल्ह्यात डिआयजी तांबोळी यांनी विशेष मोहिम राबून सुध्दा अवैध धंदे चोरी छुपे सुरूच असल्याचे कारवाई मधून दिसुन येत आहे. काल अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या सह सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या पथकाने स्वतः कळमनुरी पोलिस ठाण्याचे हद्दीत जुगारावर मोठी कारवाई केली आहे. कळमनुरी पोलिस ठाण्याचे हद्दीत वाकोडी शेत शिवारात जुगार अड्डा सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या पथकाने रविवारी साडे पाच वाजता वाकोडी शेत शिवारात अचानक धाड टाकली ज्यामधे सहा जुगारी वर कारवाई करून त्यांच्या कडून नगदी, मोटारसायकल, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकुण 1 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मुलगिर यांच्या फिर्यादीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात सहा आरोपी विरूद्ध मुंबई जुगार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यात पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या कडुन कारवाई चा धडाका सुरूच आहे.

टिप्पण्या