प्रतिनिधी - महेंद्र पुरी, हिंगोली
शनिवारी मिळालेल्या गुप्त माहिती वरून सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या पथकाने कळमनुरी बाळापुर महामार्गावर असलेल्या चंद्रवंशी यांच्या धाब्यावर डमी ग्राहक पाठुन 2 मे च्या रात्री छापा टाकून 56 हजारांच्या मूद्दे मालासहीत वैशाव्यवसाय करणाऱ्या महिला, दलाल व ग्राहक अशा 9 आरोपींविरूध कळमनुरी पोलिस ठाण्यात अनैतीक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, कळमनुरी बाळापुर महामार्गावर पार्डीमोड परिसरातील चंद्रवंशी यांच्या धाब्यावर काही महिला अनैतीक वैशा व्यवसाय करीत असल्याची गुप्त माहिती आयपिएस यतीश देशमुख यांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या पथकाने रविवारी रात्री साडेबारा वाजता सदर धाब्याचे परिसरात सापळा रचुन पाचशे रूपायांच्या नोटा देऊन पंचासोबत डमी ग्राहक पाठविले व त्यानीं ईशारा करताच पोलिस पथकाने धाब्यावर छापा टाकून अनैतीक वैशाव्यवसाय करणाऱ्या महिला, एजंट व काही ग्राहकांना ताब्यात घेतले. यावेळी 9 आरोपींना अटक करण्यात आली असुन त्यांच्या कडून 56 हजारांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई
पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे , सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख,पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक
उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, ज्ञानेश्वर मुलगीर, प्रतिभा शेटे, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनिता धुळे, संभाजी लेकुळे ,विठ्ठल काळे, किशोर सावंत, ज्ञानेश्वर पायघन, जावेद शेख, संदीप जाधव, शिवाजी पवार, कराळे, दांडेकर यांनी केली आहे.

COMMENTS