माजलगाव/प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्गावर फुले पिंपळगाव शिवारात पालावर राहणाऱ्या भिक्षुकी मागणाऱ्या गोसावी, डबेवाले, डवरी या समाजावर लॉक डाऊन व गावबंदी मुळे उपासमारीची वेळ आली असताना जळगाव जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी विनय गोसावी यांच्या सहकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी किराणा किट वाटप केले तर याची माहिती मिळताच जन आक्रोश भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या बीड जिल्हा अध्यक्षा रुक्मिणीताई गिरी यांनी संघटनेचे संस्थापक यांच्या भाऊसाहेब कांबळे, भाऊसाहेब घोडके, अमोल सोळंके, सातपुते, ज्योतीताई माने, महादेव चौरे, राठोडताई यांच्या मार्गदर्शनाखाली जन आक्रोश च्या महिलांना सोबत घेऊन 1 मे कामगार दिनाचे औचित्य साधून पाला वरील राहणाऱ्या 50 कुटुंबीयांना किराणा किट चे वाटप केले आहे.
महाराष्ट्रात कोरोना चा प्रादुर्भाव वाढल्याने माजलगाव तालुक्यातील पाला वर राहणारे पंढरपूर, औंढा, हिंगोली, जिल्ह्यातील रहिवासी असणारे गरीब गोसावी समाजाचे व डवरी गोसावी, डबेवाले कुटूंब खेडोपाडी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असतात. मात्र सध्या वाढत्या कोरोना विषाणू प्रादुर्भाव व लॉक डाऊन मुळे गावबंदी केल्याने भिक्षा बंद झाली,काम बंद आहे. तर त्यांच्यवर उपासमारीची वेळ आली हे माहीत होताच जन आक्रोश भ्रष्टाचार निर्मुलन संघटना च्या वतीने कामगार दिनाचे औचित्य साधून 50 किराणा किट चे वाटप करण्यात आले यावेळी भारत सरकार मान्यताप्राप्त जन आक्रोश भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या जिल्हाध्यक्षा रुक्मिणीताई गिरी, सारिका सावध, लताताई राऊत, पूजा भारती, माधुरी कानड, विभुते ताई, केशरबाई, अलकाताई, ज्योती राऊत, बोरसे, कमलबाई, पत्रकार धनंजय माने, शिक्षक कल्याण सावध, गवळणी, सुप्रियाताई गिरी अनिल गिरी, आर्या गिरी, सूर्या गिरी, अलका गिरी, आयोध्या गिरी, अनंता गिरी, मल्हारी गिरी, स्वप्नील सावध, स्नेहा सावध, आक्रोश राऊत,
माजलगावचे दानशूर कोरोना योद्धे कुठे गेले ?
मागील वर्षी तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी संपर्क साधून अनेकां मार्फत किराणा वाटप,अन्नदान उपक्रम राबवले होते मात्र यावर्षी एक ही दानशूर,कोरोना योद्धा पालावरील उपासमारीची बातमी आल्यावर ही पुढे आले नाहीत परंतु जन आक्रोश भ्रष्टाचार निर्मुलन संघटनांच्या वतीने 1 मे चे औचित्य साधून रुक्मिणीन ताई गिरी यांनी 50 कुटुंबाना किराणा किट चे वाटप केले.

COMMENTS