माजलगाव (प्रतिनिधी)-
माजलगाव शहर व तालुक्यातील कोविड रुग्णांच्या प्रथमोपचारासाठी तसेच विलगीकरण कक्षासाठी माजलगाव येथील तुळजाभवानी अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगाव संचलित कोविड केअर सेंटर चा लोकार्पण सोहळा दिनांक 1 मे 2021 रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून राज्याचे पालक मंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते पार पडला. सदरील कोविड केअर सेंटर भाटवडगाव येथिल अपेक्स आय.टी. कॉलेज येथे सुरु करण्यात आले आहे. शासनाने केलेल्या आवाहनानुसार सामाजिक बांधिलकीतून हे कोविड सेंटर सुरु करण्यात येत असून कोविड केअर सेंटर मार्फत देण्याच्या येणाऱ्या सर्व सुविधा विनामुल्य असणार आहेत. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य प्रकाश गवते, युवा नेते विरेंद्र दादा सोळंके आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे वेळी बोलतांना नामदार धनंजय मुंडे यांनी तुळजाभवानी अर्बनच्या सामाजिक कार्यातील अग्र सहभागाचे व आर्थिक क्षेत्रातील बेजोड कामगिरीचे कौतुक केले. समाजाची सेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून ही संस्था कार्य करत असते. हे कोविड केअर सेंटर अनेक रुग्णांच्या फायद्याचे ठरणार असून या कोविड केअर सेंटरचा लाभ माजलगाव तालुक्यातील गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ यांनी केले आहे.

COMMENTS