धर्माबाद (अहमद लड्डा) देशात कोविड लसीकरणाची मोहीम सुरू आहे. १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही..
म्हणून धर्माबाद शहरातील प्रत्येक प्रभागात कोविड लसीकर केंद्र सुरू करावे अशी मांगणी पत्रकार सामाजिक करकर्ते म.मुबशिर यांनी प्रशासनास केली आहे.
१ मे पासून १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात सुरुवात झाली आहे. त्यामुळे एकमेव असलेल्या लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे कोरोना वाढण्याची दाट शक्यता आहे.म्हणून शहरातील प्रत्येक प्रभागात कोविड लसीकरण केंद्र सुरू करावे किंवा एका प्रभागात दोन दिवस लसीकरण करावे. त्याची माहिती नागरिकांना द्यावी जेणे करून प्राथमिक आरोग्य केंद्र जे की कोविड लसीकरण केंद्र आहे येथे गर्दी होणार नाही.तसेच जेष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना नोंदणीसाठी ऑनलाईनप्रणाली वापरली जात आहे.त्यामुळे नागरिकांना बराच वेळ ताटकळत बसावे लागत आहे त्यामुळे संगणकाबरोबर मोबाईल ऑपद्वारे नोंदणी केल्यास नागरिकांची गैरसोय होणार नाही.अशी मागणी पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते म.मुबशिर यांनी केली आहे.

COMMENTS