मुखेड तालुका पत्रकार संघटनांच्या कोरोना विमा कवच चे उपक्रम अनुकरणीय - डॉ दिलीप पुंडे

मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी कोरोना  प्रादुर्भाव च्या वाढत्या काळात पत्रकार ने सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता पत्रकारिता आखडपणे सुरू...



मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी

कोरोना  प्रादुर्भाव च्या वाढत्या काळात पत्रकार ने सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता पत्रकारिता आखडपणे सुरू ठेवली आहे त्यांच्या आरोग्यच्या सुरक्षेसाठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या पुढाकारातून प्रत्येक पत्रकार साठी एक लाख रु चा कोरोना विमा काढून केलेलं  अभिनव उपक्रम अतिशय प्रशंसनीय आणि सर्वसाठी प्रेरणा दायी आहे  मुखेड तालुका मराठी पत्रकार संघटनेचे या महत्वपूर्ण उपक्रमांचा विविध संघटनांनी याचे अनुकरण करून स्वतः सह कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित करावे असे आवाहन जागतिक आरोग्य संघटना सर्पदंश व्यवस्थापन सदस्य डॉ.दिलीप पुंडे यांनी केले आहे 

मुखेड तालुका मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ऍड.संदीप कामशेट्टे यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून मुखेड येथील सुमारे २६ पत्रकार चा कोरोना सुरक्षा विमा कवच या दवरे प्रेत्येकाचा एक लाख रु चा विमा काढण्यात आला या विमा प्रमाणपत्र चे वाटप दि १ मे रोज शनिवारी महाराष्ट्र दिनी कोरना बाबत च्या सर्व शासकीय सूचना व नियमांचे पालन करून तहसील कार्यलयाच्या सभागृहात वितरण करण्यात आले. यावेळी तहसीलदार काशिनाथ पाटील, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, मुखेड भूषण डॉ दिलीप पुंडे, पेशकर गुलाब शेख यांची उपस्थिती होती यावेळी डॉ पुंडे म्हणले कोरोना च्या वाढत्या प्रसार ने सर्वाना चिंतेत टाकले असून स्वतःच्या आरोग्य च्या सुरक्षेतेसाठी व ऐनवेळी उदभवानारी आर्थिक धावपळ टाळण्यासाठी प्रेतयकाने आरोग्य विमा काढणे ही काळाची गरज आहे मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष संदीप कामशेट्टे सचिव मेहताब शेख आणि पदाधिकारी यांनी  या  बिकट काळात आतिशय  मोलाचा व स्तुत्य उपक्रम हाती घेऊन एक मह्त्वाचे पाऊल पुढे टाकले 

आहे नागरिकांना कामानिमित्त घराबाहेर पडल्या नंतर स्वतः लाअसुरक्षित वाटते पण कोव्हिड च्या काळात सुद्धा सतत कार्य करणारे महसूल कर्मचारी डोक्टर्स पोलीस व पत्रकार मंडळी मात्र घरी गेल्यानंतर घरातील कुटुंबतील सद्सयन असुरक्षित वाटते करण हे बाहेरून हे कोरोना चा व्हयरस घरात घेऊन आले का? यांची मनात सतत भीती त्याना वाटत  असते यामुळे हे वास्तव ओळखून मुखेड तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांनी पत्रकार संघाच्या सदस्य चा विमा उतरविण्याचा निर्णय घेऊन अमलात आणला आहे पत्रकाराने स्वतः साठी काढलेला विमाचे रूपांतर कौटुंबिक विमात करावे व स्वतः सह कुटूंब पुर्नपणे सुरक्षित करावे  एनेवेळी उधभवणारे आर्थीक ताणतणाव टाळावे कोव्होड चा वेगाने होणारे प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकाने  सतर्क राहावे या आजरकडे दुर्लक्ष करू नये लक्षणे दिसताच चाचणी करवून घायवे नागरिक मात्र कर्करोग च्या उपचार साठी प्रतिसाद देतात पुढे येतात मात्र कोरोना च्या चाचणी चे निदान करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत ही खणत आहे संशयित रुग्ण स कोरोना चाचणी करण्यास सांगितले असता ते मात्र तपासणीसाठी  डॉक्टर्स बदलत आहेत पण चाचणी करवून न घेता घरात राहून अत्यवस्थ गंभीर होत आहेत असे निदर्शनास आले असमयचे खणत डॉ पुंडे यांनी यावेळी विषद केली.

कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भाव काळात देशातील 154 पत्रकार ने पत्रकारिता करताना स्वतः चा जीव गमावला आहे त्यामुळे त्यांचे कुटूंबीय उघडयावर आले आहेत त्यामुळे पत्रकाराना फ्रंट लायनर कोव्हिड योद्धे म्हणून शासनने विविध योजनांचा लाभ देऊन मदत करावी अशी मागणी यावेळी पत्रकार कडून करण्यात आली कोव्हिड ने जीव गमावलेले पत्रकारण यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

 मुखेड तालुका पत्रकार संघटचे अध्यक्ष ऍड संदीप कामशेट्टे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की  सध्याचा कोव्हिडं चा काळ हा अत्यन्त धोकादायक ठरत असल्याने व ग्रामीण पत्रकारांना कुठलेही संरक्षण नसल्याने पत्रकार ना  कोरोना विमा सुरक्षा कवच उपक्रम राबवून पत्रकार साठी संकट काळी होणारी धावपळ लक्षात घेता विमा द्वारे आर्थिक तरतूद केली विमा संरक्षण मूळे लाभ मिळत असला तरी प्रत्येक ने शासकीय सूचना नियमाचे पालन करावे आपली व आपल्या कुटुंबातील सदस्य च्या आरोग्याची काळजी घ्यावि असे आवाहन केले तसेच पत्रकार च्या त्यांच्या कुटूंबीय च्या सुरक्षिततेसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण साठी एक विशेष शिबिर आयोजित करावे अशी मागणी केली मुखेड पत्रकार साठी पत्रकार भवन चा प्रश्न मार्गी लावावा म्हणून महसूल प्रशासनने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली यावेळी पोलीस निरीक्षक विलास गोंबाडे ऍड आशिष कुलकर्णी, राजेश बंडे, हासनोद्दीन शेख, ज्ञानेश्वर डोईजड यांनी मनोगत व्यक्त करून कोव्होड काळात अनुभव आणि वास्तव व्यक्त केले 

अध्यक्षीय समारोप करताना तहसीलदार काशिनाथ पाटील यांनी सांगितले की मुखेड तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी विमा संरक्षण चा राबविलेल्या उपक्रम उल्लेखनीय असून  त्याची प्रशंसा करावी तितकी कमी असल्याचे सांगितले आहे  आगामी काळात पत्रकारना कोव्हिडं प्रतिबंधक लसीकरण साठी प्रथम प्रधान्य देणार आहे पत्रकार भवन चा प्रश्न मार्गी लागाव म्हणून भूखंड हस्तांतर करण्याबाबत जिल्हा प्रशासन कदे पाठपुरावा करणार आहे पत्रकार ने स्वतःच्या आरोग्य ची काळजी घेऊन अधिक जोखीम न स्वीकारता वृत्तांकन करावे आपल्या वर जबाबदारी असून कुटूंबीय चा विचार करावा असे सांगितले सर्वनो शासकीय नियम सूचना पाळावेत कोरोना चा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी  ही साखळी तोंडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे 

सूत्र संचलन जयभीम सोनकांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन  पत्रकार संघटनेचे सचिव मेहताब शेख यांनी आभार मानले 

यावेळी उपस्थित पत्रकारांना मान्यवर च्या हस्ते विमा पॉलिसी चे वाटप करण्यात आले.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group