सोनपेठ/प्रतिनिधी
तालुक्यातील कान्हेगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोरोना या आजाराला हरवण्याचा चंग बांधला असुन यासाठी ग्रामपंचायत पातळीवर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जनजागृती करण्यात येत आहे.यात कान्हेगाव ग्रामपंचायत ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीस डोबाडी तांडा,नवीन अबाधीत वस्ती, गारगोटी तांडा,फरकांडी तांडा हा भाग जोडलेला असल्याने याठिकाणी शासनाच्या विविध योजना,सूचना,आवाहन पाठवण्यासाठी ग्रामपंचायतचे सरपंच तथा युवासेना तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे हे प्रयत्नशील असतात.मागील अनेक दिवसांपासून कोरोना या विचित्र आजाराने थैमान घातले असून या आजाराचा नायनाट करण्यासाठी देखील ग्रामसेवक राहुल सरवदे,सरपंच रामेश्वर मोकाशे,व सर्व ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी या आजाराला हरवण्यासाठी चंग बांधला असून ग्रामपंचायतच्या माध्यमातून सोडीयम क्लोराईडने फवारणी करत गावात सांडपाणी व्यवस्थापन,वेळेवर नाल्याची सफाई, पिण्याच्या पाण्याचे नियोजन आदी बाबी वेळेवर करण्यात येत असतात.सोबतच शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सूचनाचे मोठ्या स्पिकरच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS